(अजित जगताप)
सातारा दि: ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ह्युमन महाराष्ट्र (ऑफ्रोह) या संघटनेच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अधी संख्य पदाची सेवा लाभ व सेवानिवृत्तीच्या लाभातील तांत्रिक खंड वगळणे बाबत व अनुसूचित क्षेत्रातील नामसदृश्येचा फायदा घेणाऱ्या बोगस आदिवासींच्या वैधता प्रमाणपत्राची एस.आय.टी.मार्फत चौकशी करणे .या दोन प्रमुख मागण्यांसाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले. यामध्ये एक दिवसाच्या तांत्रिक खंड वगळणे बाबत दिनांक १५ जून १९९५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना पदांमधून वगळण्यात यावे. पदावर वर्ग केल्याने अनुसूचित समाजाचे पद रिक्त होणे. विमुक्त , भटक्या जमाती इतर मागासवर्गीय प्रवर्गाची पदरिक्त झाले आहेत .अशा कर्मचाऱ्यांचे सध्या बिंदू नामावलीनुसार ज्या प्रवर्गात कार्यरत आहेत. त्यांना ते कार्यरत असलेल्या प्रवर्गानुसार नियमित सेवक ग्राह्य धरण्यात यावी व त्यानुसार सर्व सेवा विषयक लाभ देण्याचे हवेत. पूर्वी दिलेल्या सर्व संरक्षणाचे बळीराजाच्या निकालानंतर पूर्ण करता येत नाही. सर्वोच्च न्यायालय खूप बहिरा यांना सेवाविषयक सर्व लाभ दिले आहेत. सेवानिवृत्तीपर्यंत ठेवून पदोन्नती अनुकंपा कालबद्ध आश्वासित प्रगती योजनेच्या सर्व लाभ देणे. मुंबई नगरपालिकेतील सर्व लाभ देण्यात यावेत .२५ डिसेंबर २०१९च्या शासन निर्णयामधील ४.२ च्या तरतुदी प्रमाणे बऱ्याच सेवा समाप्त कर्मचाऱ्यांना सेवेत घेतले नाही. त्यांना सेवेत घ्यावे. तसेच अनुसूचित क्षेत्रातील परप्रांतीय धर्मांतर केलेल्या व नामसदृश्य चा फायदा घेणाऱ्या बोगस आदिवासींच्या जात प्रमाणपत्र वैद्यता प्रमाणपत्राची एस.आय.टी. मार्फत चौकशी करावी. अशा विविध मागण्यांसाठी तसेच जनगणना २०११ नुसार २५ आदिवासी आमदार व ४ आदिवासी खासदार निर्धारित करावेत. या मागणीसाठी अनेक महादेव कोळी, भिल्ल, गौडा, पाडवी, गावित, पावरा, कोकणी अशा प्रमाणपत्राची चौकशी करून जे खरे त्या जातीचे आहेत. त्यांना त्याचा लाभ मिळावा. आदिवासी विकास विभागातील ६४०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारातील दोषीवर कारवाई करावी. अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाला मोठ्या संख्येने ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ह्युमन चे अजित कुमार बेसके, गणेश नगरदले, मारुती कोळी, केशव वानखेडे, प्रदीप धुमाळ, गडकरी, मोहन कदम, लक्ष्मी वानखेडे, सुरेखा तिकडे, उषा कुंभारे, मंगल धुमाळ, सीमा गायकवाड, सुनिता लोखंडे, नंदा वाघमारे ,सारिका धामूनसे, विजय राऊत, सुरेश गायकवाड गणेश नगरधने ,हनुमंत रसाळ, श्रीमती बेसके यांच्यासह सातारा जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, या आंदोलकांची भेट घेऊन सातारचे युवा नेते फिरोज पठाण यांनी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आदरणीय आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे पाठपुरावा करतील असे आश्वासन दिले.
——————————————-
या आंदोलनाची बातमी दाखवण्यासाठी आमच्याकडे पैसे मागू नका. अशी विनंती एका आंदोलकांनी काहींच्या कडे खुलेआम केल्यामुळे तो एक चर्चेचा विषय ठरला आहे.
————————————–