Thursday, June 19, 2025
Homeसातारा जिल्हाजावळीजि.प.प्राथमिक आदर्श केंद्र शाळा मेढा चे 30 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवले उत्तुंग...

जि.प.प्राथमिक आदर्श केंद्र शाळा मेढा चे 30 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवले उत्तुंग यश

मेढा (अभिजीत शिंगटे)- नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षा २०२४ च्या निकालात जि.प. प्राथ. आदर्श केंद शाळा मेढा चे 30 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग यश मिळवत शाळेचे नाव पंचक्रोशीत प्रसिद्ध केले आहे.

2024 मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये आदर्श केंद्र शाळा मेढा येथील विद्यार्थि यांनी परीक्षांमध्ये आपल्या शैक्षणिक दर्जाची चुणूक दाखविली आहे .या मध्ये इ. 8 वी मधील 7 विद्यार्थ्यांनी शहरी विभागातून जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे
यामध्ये श्रुती सचिन चिकणे – २५४ गुण,जान्हवी दशरथ चिकणे – २५४ गुण,विक्रांत सुर्यकांत पवार – २५२ गुण,सान्वी शंकर मोरे – २३२ गुण,श्रेया सचिन जवळ – २२८ गुण, मिनाल मोहन वाईकर – २२६ गुण,
अनुष्का सर्जेराव कांबळे – २२६ गुण मिळवले आहे.
तसेच एन.एम.एम.एस. परीक्षेतही ९ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळवली असून या मध्ये कु . अंकित अशोक साह , .कु .जान्हवी दशरथ चिकणे .कु .श्रुती सचिन चिकणे , .क़ु . सान्वी शंकर मोरे , .कु. तनुश्री चंद्रशेखर क्षीरसागर , .कु. तन्वी उत्तम लोहार , कु. अक्षरा दादासो कांबळे , .कु. जान्हवी धनावडे , .कु. स्नेहल कारभळ यांचा समावेश आहे .
तर सारथी शिष्यवृत्ती मध्ये १२ विद्यार्थि मध्ये कु. अंकिता सचिन मर्ढेकर , कु. आर्यन सचिन करंजेकर , कु. ईश्वरी अनिल सपकाळ , कु. सुयोग अजय सपकाळ , कु. श्रेया सचिन जवळ , कु. सार्थ संजय शिंदे ,कु. आदिती सचिन जवळ , कु आदिका पांडूरंग शिंदे , कु. अहंती संतोष कदम , कु. सान्हवी प्रकाश गोळे , कु. तेजस हरिष शिंदे , कु. आदर्श अंकुश जवळ यांचा समावेश आहे. जवाहर नवोदय विद्यालय निवड २०२४ करीता कु. अनुष्का सर्जेराव कांबळे ,कु. अक्षरा दादासो. कांबळे यांचा समावेश करण्यात आला आहे
या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श केंद्र शाळा मेढा च्या मुख्याध्यापिका
सौ. संजीवनी मुळे ,प्राथमिक शिक्षक श्री . शांताराम ओंबळे ,श्री . विनायक करंजेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.या प्रसंगी शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री.सुरेश शेलार सर यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला ५०० रु. आणि मार्गदर्शक शिक्षकांना मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.यावेळी माजी मुख्याध्यापक श्री. हणमंत धनावडे यांनीही प्रत्येक विद्यार्थ्याला ५०० रु. व शाल श्रीफळ देवून गौरविण्यात आले. तसेच माजी केंद्रप्रमुख सौ अलका संकपाळ यांनीही रोख रक्कम देऊन विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान केला .
सदरचा गुणगौरव व सत्कार समारंभ मेढा येथील श्री भैरवनाथ मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता.या प्रसंगी शा. व्य. स. अध्यक्ष व सर्व सदस्य, मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular