(अजित जगताप)
सातारा दि: छत्रपतींच्या राजधानीमध्ये वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कांबळे व मान्यवरांनी साताऱ्यात अनेक आंदोलने केली. त्यांना श्रेय देण्यापेक्षा लोकप्रतिनिधीमध्येच चढाओढ लागलीहोती .आता साताऱ्यातील वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना छत गळतीमुळे कोट ऐवजी रेनकोट घालण्याची वेळ आलेली आहे. याबाबत शिवसेनेने (उबाठा) आंदोलनाची मशाल हाती घेतल्याने खळबळ माजली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सातारा हे महाराष्ट्रातील सर्वोत्तम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांपैकी एक आहे. हे महाविद्यालय नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न आहे आणि त्याची स्थापना २०२१ मध्ये झाली. दुसरे छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालय सातारा असे त्याचे नामकरण करण्यात आले. वास्तविक पाहता या वैद्यकीय विद्यालयाला २०१४ साली मंजुरी मिळाली होती .त्यावेळेला शंभर विद्यार्थी व पाचशे रुग्णांचे खाटा असे त्याचे समीकरण होते. या महाविद्यालयात देशभरातील ३०० विद्यार्थी एम.बी.बी.एस. चा अभ्यासक्रम करत आहेत. यंदाच्या वर्षी या अभ्यासक्रमासाठी सर्व सुविधा उपलब्ध केल्या जातील. असे राजकीय आश्वासन दिले होते. पण, जे राज्यकर्ते मतदारांचे आश्वासन पाळत नाहीत ते वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची काळजी कशी घेतील ? असा आता प्रश्न शिवसेनेला पडलेला आहे.
आदरणीय शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सातारा जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी वैद्यकीय महाविद्यालयात पाहणी केली असता सर्व आलबेल असल्याचे दिसून आले आहे. महाविद्यालय परिसरातही तशीच अवस्था असल्यामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांना अनेक गैरसोयीसी सामना करावा लागत आहे. या ठिकाणी प्राध्यापक व महाविद्यालयातील कायमस्वरूपी व कंत्राटी कर्मचारी असे मिळून २०० लोक कार्यरत आहे. त्यांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे.
छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालय सातारा हे शौर्याचे नाव असले तरी कारभार करताना मात्र ठेकेदारांच्या टक्केवारीचे दर्शन घडत आहे. या ठिकाणच्या रंगरंगोटी उडून गेली असून दोन मजल्यावरील छताची गळती सुरू झाली आहे . वैद्यकीय अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना अध्ययन करताना सफेद कोट सोबतच रेनकोट घालावा लागत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून याकडे कुणाचे लक्ष नाही ही अति गंभीर बाब आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्रीपाद जाधव तसेच महाविद्यालयाचे उपाधिष्ठता भारतीय दासवांनी या उपस्थित होत्या. शिवसेनेचे सातारा जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांच्याकडे तक्रार करताना वैद्यकीय महाविद्यालयातील गैरसोयीचा पाढा वाचण्यात आला. ठेकेदारावर अंकुश ठेवण्यासाठी आता याची एस.आय.टी. मार्फत चौकशी करावी. अशी मागणी पुढे आलेली आहे. या ठिकाणच्या सफाई कामगाराला पावसाचे पाणी काढताना नाकी नऊ येत असले तरी बिचारे पोटासाठी दिवसभर राबवत आहेत. दोनच दिवसाने दिल्लीवरून केंद्रीय सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष पी वासुदेवन सातारला येत आहेत. त्यांनी छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी भेट देऊन क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील सफाई कामगारावर होणाऱ्या अन्याय बाबत आवाज उठवावा. अशी मागणी कामगार संघटनेचे पदाधिकारी व सफाई कामगारांनी केलेली आहे. या महाविद्यालयातील दोन मजले यांचे काम पूर्ण झाले असून तिसऱ्या व चौथ्या मधल्याचे काम सुरू आहे. काम सुरू असतानाच छताला लागलेली गळती ही टक्केवारीची लक्षणे मानली जात आहे. या इमारतीच्या बांधकामाबाबत तातडीने उपचार न झाल्यास ही इमारतीच काही दिवसात पोस्टमार्टम होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
————————————————————–
फोटो -सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालयाची झालेली अवस्था आता यावर उपचार कोण करणार? (छाया- अजित जगताप ,सातारा)
साताऱ्यातील वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना कोट ऐवजी रेनकोट घालण्याची वेळ..
RELATED ARTICLES