(अजित जगताप )
सातारा दि: छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा नगरीमध्ये तसेच
सातारा जिल्ह्यामध्ये धार्मिक महोत्सव मोठ्या आनंदाने साजरा करत असतात. अठरा वर्षानंतर या श्रावण महिन्यामध्ये पाच सोमवार आले आहेत . या पहिल्या श्रावणी सोमवारी सातारा तालुक्यातील निसर्गरम्य अशा यवतेश्वर मंदिरात अनेक भाविकांनी दर्शनासाठी धाव घेतली आहे. श्रीच्या दर्शनाने चेहऱ्यावर समाधान व आनंद घेऊन जाणाऱ्या भाविकांमुळे खऱ्या अर्थाने श्रावण सरी मनामध्ये सुद्धा कोसळल्या असल्याचे दिसून आले आहे.
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर ,महाबळेश्वर तालुक्यातील श्री क्षेत्र महाबळेश्वर, सातारा तालुक्यातील संगम माहुली येथील काशी विश्वेश्वर मंदिर, देगाव येथील पाटेश्वर मंदिर सातारा शहरातील शुक्रवार पेठेतील मंदिर, कोटेश्वर मंदिर लिंब – गोवे येथील कोटेश्वर मंदिर, परळी येथील पांडवकालीन शिवमंदिर तीर्थक्षेत्र नागनाथ वाडी फलटण येथील जबलेश्वर मंदिर ,कराड तालुक्यातील वैजापूर येथील पावकेश्वर मंदिर गोंदवले येथील कराड तालुक्यातील कोयनेश्वर मंदिर सदाशिव गड मधील शंभू महादेव मंदिर भाडळी खुर्द येथील ओम संगमेश्वर महादेव मंदिर शिरवळ येथील केदारेश्वर मंदिर माण तालुक्यातील लिंगेश्वर मंदिर वाई येथील भद्रेश्वर मंदिर, खटाव तालुक्यातील श्री सिद्धेश्वर कुरोली ,वडूज येथील श्री तारकेश्वर,श्री महादेव मंदिर, गोंदवले येथील भीमाशंकर मंदिर, कोरेगाव तालुक्यातील हरीश्वर मंदिर ,जावळी तालुक्यातील नरफदेव मेरुलिंग मंदिर, मरण मोरे येथील मरडेश्वर मंदिर केळकर येथील काळेश्वर मंदिर येथील तसेच कोयनेश्वर मंदिर, शंभू महादेव मंदिर, संगमेश्वर महादेव मंदिर, रायगाव व सायगाव येथील महादेव मंदिर अशा अनेक ठिकाणी भाविकांनी शिवमंदिरात जाऊन मंदिरातील गाभाऱ्यातील पिंडीचे दर्शन घेऊन श्रावणी सोमवार साजरा केला.
यावेळी अनेकांचे उपवास असल्यामुळे खिचडी, शाबू वडा, केळी ,वेफर्स उपासाचे साहित्य अशा सुमारे आठ ते दहा लाख रुपयांची विक्री झाल्याची माहिती विविध भागातील फळ विक्रेते व हॉटेल व्यवसायिकांनी दिली. विशेषतः तरुण व महिलांची गर्दी मोठ्या संख्येने दिसून येत होती. श्रावण महिन्यातील अनेक सण हे माता-भगिनींशी निगडित असल्यामुळे खऱ्या अर्थाने सावन को आने दो… सावन का महीना पवन करी शोर … कुछ कहता है ये सावन… श्रावणात घन निळा बरसला…अशा मधुर गाण्याने सुद्धा रसिकांना व भाविकांना मनमुराद आनंद दिला. या गाण्यांनी जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.
बऱ्याच मंदिराच्या आवारात व परिसरात दूचाकी व चार चाकी वाहनांची गर्दी होऊ लागल्यामुळे अनेक वयोवृद्ध भाविकांना अडथळा सुद्धा सहन करावा लागला. पुढील श्रावण सोमवारी स्थानिक ग्रामस्थ यांनी वाहतूक व्यवस्था बघावी. अशी मागणी वयोवृद्धांनी केलेली आहे.
———————————————-
फोटो यवतेश्वर मंदिरात दर्शनासाठी झालेली गर्दी (छाया- अजित जगताप, सातारा)