Friday, April 25, 2025
Homeकरमणूकवाद-विवादानंतर ऑलिम्पिकचे बिगुल 5 ऑगस्टपासून वाजणार

वाद-विवादानंतर ऑलिम्पिकचे बिगुल 5 ऑगस्टपासून वाजणार

रिओ डी जेनेरिओ : गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकलेले आणि आर्थिक समस्यांचा मारा झेलणार्‍या रिओ डी जेनेरिओमध्ये 5 ऑगस्टपासून ऑलिम्पिकचा धडाका रंगेल. विशेष म्हणजे यासह हा क्रीडा कुंभमेळा आयोजित करणारा पहिला दक्षिण अमेरिकी देश म्हणून ब्राझील नवा इतिहासही रचेल.
स्पर्धेसाठी सर्व स्टेडियम सज्ज असून त्यांना आता फिनिशिंग टच दिला जात आहे. 5 ते 21 ऑगस्ट दरम्यान रंगणार्‍या या जागतिक क्रीडा महोत्सवासाठी ब्राझीलमध्ये सुमारे 5 लाखहून अधिक क्रीडाप्रेमींची उपस्थिती राहण्याची शक्यता आहे. रिओ शहर पुर्णपणे सज्ज असून मला माझ्या शहराचा गर्व आहे,असे रिओचे राज्यपाल एडुआर्डो पेस यांनी सांगितले.
खेळाडू आणि पदकांच्याबाबतीत सांगायचे झाल्यास वेगाचा बादशाह उसेन बोल्टपासून विश्वविक्रमी जादुई स्वीमर मायकल फेल्प्स सारख्या अनेक दिग्गज खेळाडूंसह 10 हजार खेळाडू पदकांच्या शर्यतीत आहेत. एकीकडे जगभरातील खेळाडू ऑलिम्पिकमध्ये स्वत:ची छाप पाडण्यासाठी रिओमध्ये मोठ्या तयारीने येत असताना, दुसरीकडे स्थानिक नागरिकांकडून मात्र या सोहळ्यालाच विरोध होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रिओ शहरात वाढ होणार्‍या गुन्हेगारीमुळे शहराची बदनामी होत आहे. शहरात खून प्रकरणही वाढले असून रस्त्यांवर होणार्‍या गुन्ह्यांतही वाढ झाली आहे. त्यातच सोमवारी रिओ शहराच्या मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळावर 100 हून अधिक अधिकार्‍यांनी स्वागत कक्षामध्ये नरकामध्ये तुमचे स्वागत आहे अशा आशयाचे फलक लावून विरोध केला. अनुभवी पोलिस अधिकारी अलेक्झेंडर नेतो यांनी सांगितले, आम्ही येथे नागरिकांना आणि जगभरातील पर्यटक व क्रीडाप्रेमींना ब्राझीलची वस्तुस्थिती सांगण्यास आलो आहोत. त्यांना व आम्हाला मुर्ख बनविण्यात आले आहे. येथे सर्वसामन्यांची सुरक्षा व्यवस्थेसारखे काहीही नाही. या सर्व विरोध प्रदर्शनाबरोबरच आर्थिक मंदी आणि झिका वायरस सारखे संकटही स्पर्धा आयोजकांपुढे आ वासून उभे आहेत. स्पर्धा आयोजनांपुर्वीच रिओ शहरामध्ये अनेक वाद उफाळून आले. रिओच्या रस्त्यांवर एकूण 85 हजार पोलिस तैनात राहणार असून 2012 लंडन ऑलिम्पिकच्या तुलनेत ही संख्या दुप्पट आहे. तसेच इस्तांबूल आणि बगदाद येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर ऑलिम्पिक स्पर्धेवरही संकटाचे ढग निर्माण झाले आहेत.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular