कराड : सार्वजनिक गणेश मंडळांना नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांनी जाचक नियमांच्या अटी घातल्या आहेत. त्या अटी सार्वजनिक दृष्टया हिताच्या नाहीत. गणेश उत्सव हा धार्मिक बाब आहे. या उत्सवात कायदा आणि व्यवहाराची सांगड घातली जावी. नाहीतर मुख्याधिकांर्याच्या भूमिकेच्या विरोधात तीव्र भूमिका घेतली जाईल. असा इशारा आज गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोर्चाद्वारे दिला.
सार्वजनिक गणेश मंडळासाठी कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जाचक अटी घातल्या आहेत. या अटींच्या विरोधात गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत आज नगरपालिकेवर महामोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व विक्रम पावसकर, हणमंतराव पवार, बाळासाहेब यादव, श्रीकांत मुळे, पोपटराव साळुंखे, यांच्यासह आजी माजी नगरसेवक विविध मंडळांचे पदाधिकारी यांनी केले.