Friday, April 25, 2025
Homeठळक घडामोडीशेतकर्‍यांच्या हितासाठी सातारा जिल्हा विकास आघाडीची जुळवाजुळव ; समविचारी व्यक्ती , संघटनांची...

शेतकर्‍यांच्या हितासाठी सातारा जिल्हा विकास आघाडीची जुळवाजुळव ; समविचारी व्यक्ती , संघटनांची मोट बांधण्यांचे उदयनराजे यांचे प्रयत्न

सातारा : सध्या शेतकर्‍यांच्या कुटुुंबाची अत्यंत बिकट अवस्था बनवली गेली आहे. शेतकरी आणि मुळ गाभा असलेल्या ग्रामिण संस्कृतीची होत असलेली गळचेपी कोणालाच दिसत नाही. सर्वच स्तरावरुन, शेतकरी व ग्रामिण जनतेविषयी आत्मियताच राहीली नसल्याचे चित्र आहे. त्यातच ग्रामिण जनतेच्या विकासाचा कणा म्हणून ओळखल्या जाणार्‍या जि.प.व पं.समितींची सार्वत्रिक निवडणुक येवू घातली आहे. या पार्श्‍वभुमीवर शेतकरी आणि ग्रामिण जनतेच्या प्रश्‍नांना सर्वोच्य प्राधान्य देणार्‍या  तथापि प्रस्थापित व्यवस्थेकडून डोईजड होईल म्हणून वेळोवेळी डावलण्यात आलेल्या किंवा खच्चीकरण केल्या गेलेल्या  समविचारी, सर्वपक्षिय  व्यक्तींचे संघटन करुन, राजधानी सातारा जिल्हा विकास आघाडी स्थापन करावी. त्याचे नेतृत्व त्या त्या तालुक्यातील सुज्ञांनी करावे असे आम्हास मनोमन वाटते. त्याबाबतचा विचारविनिमय करण्यासाठी दिनांक 27 डिसेंबर 2016 रोजी कल्याण रेसॉर्ट, एमआयडीसी सातारा येथे दुपारी 1.30 ते 5.00 वाजेपर्यंत लोकसभा मतदार संघातील सर्व तालुक्यामधील कोणत्याही पक्षाचे जे कोणी उत्साही समविचारी उपस्थित राहतील त्यांच्याशी आम्ही व्यक्तीगत चर्चा करणार आहोत अशी माहीती खा.श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
याबाबत खा. उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे की,  शेतकर्‍यांविषयी पोकळ कळवळा दाखवणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानेच, बळीराजाची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत आहे. शेतकर्‍यांच्या ज्वलंत प्रश्‍नांची सोडवणुक करण्याचे कोणालाच भान राहीलेले नाही. शेतकरी आणि ग्रामिण संस्कृती टिकली पाहीजे असे नुसते बोलले जाते, परंतु त्यादृष्टीने कोणतीही ठोस कृती केली जात नाही. याउलट शेतकर्‍यांशी निगडीत प्रश्‍न कसे चिघळत राहतील, प्रलंबीत राहीतील अशीच व्युहरचना आखली जात आहे असे एकंदरीत सर्वसाधारण चित्र महाराष्ट्रात जवळजवळ सर्व ठिकाणी दिसत आहे.
त्यातच ग्रामिण विकासाचा केंद्रबिंदु असलेल्या पंचायत समित्या आणि जिल्हापरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका लवकरच होत आहेत. ग्रामिण विकासाच्या दृष्टीेने अशा संस्थांवर शेतकर्‍यांविषयी खरे प्रेम आणि आस्था असलेल्या व्यक्ती आल्यास, शेतक-यांच्या प्रश्‍नांचे निराकरण करण्यासाठी प्राथमिक स्तरावरच योग्य उत्तर शोधण्याचे प्रयत्न होतील. शेतक-यांविषयी आस्था असलेल्या अशा लोकप्रतिनिधीच्या माध्यमातुन शेतकरी समाधानी राहण्यासाठी गांव पातळीवर  प्रयत्न होण्याबरोबरच सातत्याने खच्चीकरण करण्यात आलेल्या किंवा वारंवार डावलले गेलेल्या परंतु  शेतक-यांविषयी कळवळा असलेल्या हाडाच्या कार्यकर्त्यांना एकप्रकारे नवीन संधी मिळणार आहे. शेतक-यांच्या प्रश्‍नांबरोबरच, ग्रामिण भागातील नळपाणीपुरवठा,पाझर तलाव, शिक्षण, आरोग्य, वनीकरण, वृक्षलागवड महिला सक्षमीकरण,सार्वजनिक आरोग्य इ.सोयी सुविधांबरोबरच ग्रामिण भागांचा सर्वांगिण विकासाचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी  प्रस्थापितांकडून  खच्चीकरण आणि डावलेल्या, कार्यकत्यार्ंंना संधी मिळाल्यास, अशा संधीचा अंतिम लाभ, ग्रामिण भागातील विकासाला गती देणारा आणि शेतकरी जनतेलाच होणार आहे.
या पार्श्‍वभुमीवर प्रस्थापित  व्यवस्थेने ठेकेदार,पुरवठादार यांचे चोचले पुरवण्यासाठी ज्या सर्वसामान्य परंतु हाडाच्या समाजसेवकांना वेळोवेळी डावलले आहे आणि  ज्यांना शेतकरी आणि ग्रामिण जनतेविषयी विशेष आस्था आहे अशा समविचारी आणि सर्वपक्षिय लढावू व्यक्तींचे योग्य संघटन राजधानी सातारा जिल्हा विकास आघाडीच्या माध्यमातुन केले जावे, सातारा लोकसभा मतदार संघातील प्रत्येक तालुक्यातील संबंधीत सुज्ञांनी, त्यांच्या त्यांच्या तालुक्यात आघाडीचे नेतृत्व करावे आणि या राजधानी जिल्हा विकास आघाडीच्या माध्यमातुन शेतकरी आणि ग्रामिण जनतेचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी  सक्षम पर्याय मिळावा असे विचार आमच्या मनामध्ये येत आहेत.
म्हणूनच प्रस्थापित राज्यव्यवस्थेकडून, वेळोवेळी ज्यांना डावलले, खच्ची केले, ज्यांचा आवाज  लंगडया सबबीखाली दाबुन टाकला अशा सर्वपक्षिय  लढावू  व्यक्तींशी, विचारविनिमय करण्यासाठी आम्ही स्वतः कल्याण रेसॉर्ट येथे बुधवार दिनंाक 27 डिसेंबर 2016 रोजी दुपारी 1.30 ते 5.00 वाजेपर्यंत वेळ राखुन ठेवला आहे. सातारा जिल्हयातील,राष्ट्रवादीकॉग्रेस, कॉग्रेस भाजपा, शिवसेना,आरपीआय,शेतकरी संघटना, रासप,बसप, आणि अन्य सर्व पक्षिय व्यक्तींनी, आमच्या शेतकरी आणि ग्रामिण जनतेच्या विकासाच्या विचारांशी सहमत असल्यास व्यक्तीगतरित्या कल्याण रेसॉर्ट येथे उपस्थित रहावे असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular