सातारा : सातारा बसस्थानक ते तहसिल कार्यालय दरम्यान रस्त्या दुतर्फा बाजूने असलेली अतिक्रमणे हटविण्याबाबत केलेल्या सतोवाचाला प्रतिसाद देत संबंधित व्यापार्यांनी आज स्वत:हून अतिक्रमणे हटविली.
कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी सातारा येथील जनता दरबारात सातार्यातील अतिक्रमणे काढण्यासंदर्भात सुतोवाच केले होते. या पाश्वभूमीवर व्यापार्यांनी स्वत:हून अतिक्रमणे आज संपूर्ण दिवसभर काढून घेतल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. या रस्त्यावरील पादचारी मार्गावर मोठ्या प्रमाणावर टपऱ्या टाकण्यात आल्या होत्या . या व्यापार्यांना पर्यायी जागा तहसिल कार्यालयाच्या पाठीमागे देण्यात आली आहे.