Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीआरोग्य विभागाचा लिपीक एसीबीच्या जाळ्यात

आरोग्य विभागाचा लिपीक एसीबीच्या जाळ्यात

साताराः दप्तर तपासणीच्या नावाखाली बामणोली (कसबे), ता. जावली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे क्लार्क नागनाथ नागुलवाड रा. गुणीपूर, ता. उमरी, नांदेड सध्या रा. शाहूपुरी, सातारा यांना बुधवारी दुपारी 850 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
याबाबत माहिती अशी की, मूळ तक्रारदार ह्या प्राथमिक आरोग्य केंद्र बामणोली, ता. जावली या ठिकाणी आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे आरोग्य केंद्राची दप्तर तपासणी ऑगस्ट 2017 मध्ये झाली आहे. त्यांचे या दप्तर तपासणीच्या नावाखाली आरोग्य केंद्राचे क्लार्क नागनाथ नागुलवाड हे 850 रुपये लाच मागणी करीत असल्याबाबत त्यांची दि. 19 सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार नोंदवली.
तक्रारारीच्या अनुशंगाने दि. 27 सप्टेंबर रोजी केलेल्या पडताळणी कारवाईमध्ये क्लार्क नागुलवाड यांनी ऑडीटरने घेतलेल्या दप्तर तपासणीच्या नावाखाली प्रत्येक कर्मचार्‍यांचे 900 रुपये प्रमाणे पैसे भरल्याचे सांगून तक्रारदार यांच्याकडे 850 रुपयांची लाच रक्कमेची मागणी केली. त्यास रंगेहात पकडून मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत पोनि. आरीङ्गा मुल्ला, बयाजीराव कुरळे, संभाजी बनसोडे, भरत शिंदे, आनंदराव सपकाळ, पोना. तेजपाल शिंदे, संजय साळुंखे, संजय अडसुळ, अजित कर्णे, विनोद राजे, संभाजी काटकर, विशाल खरात, मधुमती कुंभार, निलीमा जमदाडे, श्रध्दा माने यांनी सहभाग घेतला. या कारवाईबद्दल पोलीस उपअधीक्षक सुहास नाडगौडा अभिनंदन केले.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular