Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीदिडवाघवाडी अपघातात वैष्णवी ज्वेलर्सचे मालक अनिल माळवे यांचा मृत्यू

दिडवाघवाडी अपघातात वैष्णवी ज्वेलर्सचे मालक अनिल माळवे यांचा मृत्यू

म्हसवड: मायणी-म्हसवड रस्त्यावर दिडवाघवाडी जवळ वैष्णवी ज्वेलर्सचे मालक अनिल तानाजी माळवे रा.पळशी ता.माण यांचा ते चालवीत असलेल्या कारचा टायर फुटून गाडीने अनेक पलट्या खालल्याने ते जागीच ठार झाले.
याबाबतची फिर्याद अर्जून आनंदा खोत यांनी म्हसवड पोलिसात दिली असून याबाबतची अधिक माहिती अशी, अनिल तानाजी माळवे वय-36रा.पळशी ता.माण येथील रहिवासी असून त्यांचे म्हसवड येथे वैष्णवी ज्वेलर्सचे दुकान आहे. ते मंगळवार 12 रोजी गटेवाडी ता.माण येथे मित्राच्या लग्नाला गेले होते.
लग्नाहून म्हसवडला परतत असताना त्यांच्या आल्टो कार क्रमांक एम.एच.11ऐ.के.5749 या कारचा डाव्या साईटचा टायर म्हसवड मायणी रस्त्यावर दिडवाघवाडी जवळ फुटला गाडी वेगात असल्याने अनिल यांना गाडी कंट्रोल न झाल्याने कारने अनेक पलट्या खाल्याने त्यांचा कार मधून खाली पडून मृत्यू झाला.
या घटनेने पळशी गावावर शोककळा पसरली तर म्हसवडचा बुधवार  आठवडा बाजार दिवसी ज्वेलर्स संघटनेने सराफी दुकाने बंद करून श्रध्दांजली वाहिली.तर पळशी येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबतचा अधिक तपास सपोनि मालोजीराव देशमूख करीत आहेत.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular