Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीसातारारोडमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण ;  बलात्कारप्रकरणी शिवथरच्या युवकास अटक 

सातारारोडमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण ;  बलात्कारप्रकरणी शिवथरच्या युवकास अटक 

कोरेगाव: तालुक्यातील सातारारोड येथे नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस बाजारपेठेतून अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन, तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी शिवथर, ता. सातारा येथील इंद्रराज उर्फ निखिल दीपक साबळे वय 20 याला बुधवारी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, की सातारारोड येथील बाजारपेठेतून दि. 30 नोव्हबर रोजी इंद्रराज उर्फ निखिल दीपक साबळे याने आपले सहकारी मित्र स्वप्निल उर्फ चिन्या आनंदराव साबळे, विक्रम बाळकृष्ण साबळे, नवनाथ रवींद्र माने यांच्या मदतीने एका मारुती व्हॅनमधून अल्पवयीन मुलीचे अपहरण केले होते. सख्या भावाला जीवे मारण्याची धमकी देऊन इंद्रराज याने तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला.
याप्रकरणामध्ये दमयंती हनुमंत साबळे वय 67 यांनी इंद्रराज उर्फ निखिल दीपक साबळे याला मदत केली होती. पिडीत अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर कोरेगाव पोलीस ठाण्यात  पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस उपनिरीक्षक बळीराम सांगळे व सहकार्‍यांनी तातडीने हालचाल करुन गुन्ह्यातील सहभागी सहकारी मित्रांना अटक केली होती. मात्र इंद्रराज र्उ निखिल दीपक साबळे हा रार झाला होता. त्याला  बुधवारी पोलीस पथकाने अटक केली. न्यायालयात त्याला हजर केले असता चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular