Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीखोट्या अ‍ॅट्रॉसिटी केसेस विरूद्ध क्रांतिकारकांची राजधानी सातारा येथून हल्लाबोल आंदोलनाला सुरूवात ...

खोट्या अ‍ॅट्रॉसिटी केसेस विरूद्ध क्रांतिकारकांची राजधानी सातारा येथून हल्लाबोल आंदोलनाला सुरूवात ; मराठा समाज राजेंद्र चोरगे यांच्या पाठीशी

सातारा : मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र यांच्या वतीने राजेंद्र चोरगे यांचे विरोधात जेधे कुटुंबिय व काही संघटना प्रतिनिधी खोटी अ‍ॅट्रॉसिटी दाखल करण्यासाठी चालविलेल्या प्रयत्नाबाबत मराठा समाजातर्फे निषेध व्यक्त करण्यासाठी व अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा दुरूपयोग करणार्‍या प्रवृत्तींना प्रतिबंध करण्यासाठी तसेच सामाजिक स्वास्थ बिघडविण्याचा प्रयत्न करणार्‍या प्रवृत्तींवर कठोर कारवाई करणेबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक सातारा यांना निवेदन देण्यात आले.
यापुढे मराठ्यांवर अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा वापर करून कोणत्याही प्रकारचा अन्याय अथवा अत्याचार झाल्यास संघटनेच्या माध्यमातून लढा दिला जाईल असा निर्धार या प्रसंगी करण्यात आला.
याप्रसंगी निवेदन देण्यासाठी विवेकानंद बाबर, अ‍ॅड.उमेश शिर्के, प्रविण पवार, राजेंद्र क्षीरसागर, नितीराज सुर्यवंशी, विशाल राजेमहाडिक, धनंजय कदम, रमेश भोसले, धनवडे मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र समन्वय मोठ्या संख्येने हजर होते.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular