सातारा ः जीवनात बुध्दीमत्ते बरोबरच शारिरिक जडणघडणही तितकीच महत्वाची आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी,ध्येय,कष्ट आणि सातत्यही हवेच . जीवनात खेळांचे महत्व मोठे आहे. आपण सवार्ंनी सुदृढ मनासाठी सुदृढ शरीरही कमवा.आज विजय मिळवला तर हुरळून जाउ नका,आणि हरला तर खचून जाउ नका असे उद्गार शिवछत्रपती पुरस्कार विजेते ज्येष्ठ मल्लखांबपटू आणि मार्गदर्शक सुजीत शेडगे यांनी काढले.
सातारा येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यु इंग्लिश स्कुलच्या 2017 च्या वाषिर्ंक क्रिडा महोत्सवास मोठ्या उत्साहात आज प्रारंभ झाला, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुजीत शेडगे उपस्थित होते. त्यांनी वरील उद्गार काढले. यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू सौ.प्राची वेलणकर थत्ते याही प्रमुख पाहुण्या म्हणून होत्या तर प्रभारी शालाप्रमुख डी.एस. कांबळे, क्रिडा महोत्सवाच्या प्रमुख सौ.सीमा जोशी, उपप्रमुख घनश्याम नवले, पर्यंवेक्षक जे. वाय.जाधव,गौतम वाघमारे, सुजाता पाटील , अक्षता जाधव यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
आमीॅ आणि नेव्ही ग्रुपच्या कॅडेटसच्या सोबत या मान्यवरांचे व्यासपीठावर आगमन झाल्यावर प्रभारी शालाप्रमुख डी.एस. कांबळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले त्यानंतर कुरणेश्वर येथुन आणलेल्या शाळेच्या क्रिडा ज्योतीचे आणि सरस्वती देवीचे पुजन करुन फुग्यांनंी सजवलेला शाळेच्या नावाचा फलक व जीवंत कबुतरे आकाश सोडत या महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले.
आपल्या प्रास्ताविकात डी.एस. कांबळे यांनी कला,क्रिडा तसेच सर्वच श्रेत्रात आपली शाळा अग्रेसर असून केवळ बोैध्दिक विकास महत्वाचा नाही तर यासाठी शारिरिक विकास ही व्हावा यादृष्टीने हा महोत्सव शाळा घेत आहे. गेली अनेक वर्षे या महोत्सवातून मोठ्या पातळीवर खेळाडू निर्माण झाले आहेत. निरोगी शरीर हे निरोगी मन निर्माण करते. आज लाभलेले पाहुणे ही याच शाळेचे माजी विद्यार्थी असून त्यांनी उत्तुंग यश संपादन केले. असेच यश तुम्ही ही भावी आयुष्यात मिळवा असे सांगितले.
सौ.प्राची थत्ते यांनी खेळात जिद्द महत्वाची आहे. अभ्यास आणि खेळाचा समन्वय साधा,चिकाटी महत्वाची असून आज खेळत उद्या मोठे व्हा अशा शब्दात सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
क्रिडा महोत्सवात प्रमुख पाहुण्यांपुढे शालेय मुला मुलींनी रिंग कवायत,निशाण कवायत, घुंगुर काठी,मर्दानी खेळात पेटलेले पलीते व लाठी काठीचे प्रात्याक्षिक, झांजपथक, मानवी मनोरे, लेझीम पथक, झुंबा हा दक्षिण अफ्रिकेतील एरोबिक्स अर्थात व्यायाम प्रकार सादर केले. यावेळी शाळेच्या घोषपथकाच्या वतीने सचीन राजोपाध्ये व राजेंद्र आफळे सरांच्या मार्गदर्शनाखाली मुलामुलींनी सुरेख बँड,बासरी बिगुल व ढोल वादन केले.
समारंभात शाळेच्या वतीने राष्ट्रीय तसेच राज्य,विभागीय व जिल्हा स्तरावर विशेष प्रावीण्य मिळवेलल्या सर्व मुलामुलींचा सत्कार सन्मान चिन्हे देउन करण्यात आला तसेच दिल्ली येथील आरडीसी या विशेष संचलनात सहभागी झालेली शाळेची कु.अक्षता सहदेव जाधव या बॉक्संींगपटूचा विशेष सत्कार करण्यात आला.
समारंभाचे सुत्रसंचालन सुधाकर गुरव यांनी केले तर आभार प्रदर्शन खटावकर सर यांनी केले. 2 दिवस चालणार्या या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे प्रभारी शाला प्रमुख डी. एस. कांबळे, पर्यंवेक्षक जे. वाय.जाधव,गौतम वाघमारे, सुधीर विसापुरे,सौ. पुजा पाटील, क्रिडा महोत्सवाच्या प्रमुख सौ.सीमा जोशी,उपप्रमुख घनश्याम नवले,संग्राम उथळे,कैलास बागल ,एस. एन. जाधव, दिपक पवार, कु. शेवते, श्री.पाटील,वाय.डी.जाधव, सौ.हराळे, श्री.काकडे, श्री.मजलेकर, श्री.वनवे. श्री.मोरे, कु.जान्हवी देशपांडे, सौ.सुवर्णा देशपांडे आदी परीश्रम घेत आहेत.
जीवनात खेळांचे महत्व मोठे ; सुदृढ मनासाठी सुदृढ शरीरही कमवा : सुजीत शेडगे ; डेक्कन एज्युकेशन सोसायटी न्यु इंग्लिश स्कुलच्या 2017 च्या वार्षिक क्रिडा महोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ
RELATED ARTICLES