ढेबेवाडी :दि. 22 ( प्रतिनिधी ) कोयना धरण पायथा वीजगृहाजवळ स्वीचयार्डजवळ शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता विद्युतदाब वाढल्याने अचानक स्फोट झाला. यामुळे कोयना परिसरात काहीकाळ भितीचे वातावरण पसरले.
याबाबत मिळालेली माहिती अशी कोयना धरण पायथा वीजनिर्मिती प्रकल्पाजवळ उजव्या 40 मेगावॉट क्षमतेच्या बाहेरच्या बाजूला असणाऱ्या 220 के. व्ही. स्वीचयार्ड आहे. या वार्डाजवळ रात्री अचानक स्फोट झाला. यात त्याठिकाणचे काही विद्युतसंच जळाले. यामुळे वनकुसवडे, सातारा, पोफळी आदी ठिकाणी बराचकाळ अंधार झाला. या स्फोटात कोणीही जखमी झाले नाही. हा स्फोट स्थानिक कर्मचार्यांच्या दुर्लक्षपणामुळे झाल्याचा स्थानिकांमधून आरोप होत असून याच्या चौकशीची मागणी केली गेली आहे. .
कोयना पायथा वीजगृहाजवळ स्फोट
RELATED ARTICLES