Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीसातार्‍यात गुरूवार दि. 28 पासून वार्षिक रथोत्सवास प्रारंभ ; दि. 1...

सातार्‍यात गुरूवार दि. 28 पासून वार्षिक रथोत्सवास प्रारंभ ; दि. 1 जानेवारी रोजी शहरातून साजरा होणार रथोत्सव

साताराः  येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिर सातारा च्या  देव देवतांचा वार्षिक  रथोत्सव सोहळा गुरुवार दि. 28 डिसेंबर ते  मंगळवार दि.2 जानेवारी 2018 दरम्यान साजरा होत आहे. कांची कामकोटी पीठाचे जगदगुरु शंकराचार्य महास्वामी श्री श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामी यांच्या कृपेने व महास्वामी प.पू. श्री श्री जयेंद्र सरस्वती व परमपूज्य श्री श्री शंकर विजयेंद्र सरस्वती यांचे शुभाशिर्वादाने हा सोहळा संपन्न होत आहे. या निमित्त मंदिरात उद्या गुरुवारी दि. 28 रोजी सायंकाळी 5 वाजता ध्वजारोहण संपन्न होणार आहे. तसेच शुक्रवारी सकाळी 6 ते दुपारी 12 या वेळेत श्री गणपती होम,ऋग्वेद,यजुर्वेद,सामवेद,अथर्ववेद या चारही वेदांचे पारायणाला प्रारंभ होणार आहे. याच वेळी घटस्थापना होउन महागणपती,राधाकृष्ण,श्रीमूलनाथेश्‍वर,उमा देवी यांचा मूलमंत्र जप, होम,अभिषेक व आरती होणार असून या चारही वेदांची पारायणे दुपारी 3 ते 6 यावेळेत  दि 2 जानेवारी पयर्र्त सुरु रहाणार आहेत. नटराज मंदिरात संपन्न होणारे वार्षिक रथोत्सव सोहळयातील सर्व धार्मिक कार्यक्रम सातारा येथील वेदमुर्ती दत्ताशास्त्री जोशी यांचे अधिपत्याखाली विविध ब्रह्मवृंदाच्या सहकार्याने संपन्न होणार आहेत.
  शुक्रवार दि. 29 रोजी सायंकाळी सहा वाजता श्री राधा कृष्ण या देव देवतांचा कल्याणोत्सव म्हणजेच लग्न सोहळा होणार असून शनिवार दि. 30 डिसेंबर रोजी सकाळी 6 ते 12 या वेळेत श्री गणपती होम, चतुर्ंवेद पारायणे, घटस्थापना, श्री नटराज प्रकारदेवता मुलमंत्र जप , होम व अभिषेक होउन आरती होणार आहे. रविवारी दि. 31 डिसेंबर रोजी  सकाळी सहा ते 12 या वेळेत श्री गणपती होम चतुर्वेद पारायण, घटस्थापना होउन श्री मारुती, आंजनेय,नवग्रह, अय्यपा यांचा मुलमंत्र जप व होम हवन होउन दुपारी आरती होणार आहे. दुपारी 3 ते 6 यावेळेत दिपोत्सव तसेच श्री महागपतीचा रथोत्सव संपन्न होणार आहे.
 सोमवारी दि. 1 जानेवारीला सकाळी पाच वाजता श्री गणपती होम होउन वेद पारायण,मूर्तींचे यात्रादान विधी होउन रथयात्रेला प्रारंभ होणार आहे. या वर्षी रथपूजन सोहळयासाठी विवध क्षेत्रातील मान्यवर  उपस्थित रहाणार आहेत.  सातारा येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त ईश्‍वर सुर्यवंशी त्यांच्या सुविद्य पत्नी, मुथा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे प्रमुख संचालक  अजितशेठ मुथा, त्याच्या सुविद्य पत्नी सौ.प्रेमा मुथा ,लेख़ा परिक्षक सतीश चौरासिया या सर्व मान्यवरांचे  शुभहस्ते हा  रथ पूजन सोहळा संपन्न हाणार आहे. रथपूजन झाल्यावर नटराज मंदीर, जि. प. अध्यक्ष बंगला, साईबाबा मंदिर गोडोली, पोवईनाका, शिवतीर्थवरुन हा रथ आयडीबीआय बेँकेवरुन नगरपालिका चौक, पोलिस करमणूक केेंद्र मार्गे कमानी हौद देवी चौकातून राजपथावरुन मोती चौेक व राजवाडा येथे आल्यावर दुपारी 1 ते 2  यावेळेत हा रथ भाविकांना दर्शनासाठी राजवाडा येथे थांबणार आहे. त्यानंतर मोतीचौक मार्गे कर्मवीर भाउराव पाटील पथावरुन हा रथ सोहळा सदाशिव पेठ, 501 पाटी, शनिवार पेठेतून पोलिस मुख्यालयावरुन परत पोवई नाका , कुबेर विनायक मंदिर मार्गे सर्कीट हाउस वरुन नटराज मंदिर येथे सायंकाळी येणार आहे. रथाचे मंदिर प्रांगणात आगमन झाल्यावर सायंकाळी 7 वाजता जिल्ह्यातील विविध देवस्थान व तीर्थक्षेत्राचे महंत व मठाधिपती यांचे हस्ते रथातील देवतांची महामंगल आरती केली जाणार आहे. यावेळी काळभैरव देवस्थान ट्रस्टचे अधिकारी प्रकाश कुलकर्णी,त्रिपुटी देवस्थानचे प.पू. श्रीपाद महाराज, श्रीसत्यसाई सेवा समिती साताराचे प्रमुख शशिकांत शिंदे उपस्थित रहाणार आहेत .मंगळवारी दि. 2 जानेवारीला सकाळी 5 ते 12 या वेळेत श्री गणपती होम, चर्तुवेद पारायण होउन  पुणे येथील श्री राधाकृष्ण शास्त्री मेमोरियल ट्रस्टचे वतीने श्री नटराज व शिवकामसुंदरी देवीस महाभिषेक होउन या देवाचा लग्न सोहळा अर्थात कल्याणोत्सव संपन्न होणार आहे. त्यानंतर पारायण समाप्ती होउन महाप्रसाद वितरीत केला जाणार आहे.
 वरील सर्व रथोत्सवाचे कार्यक्रमास सातारकर भावीकांनी तन,मन,धन अर्पून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नटराज मंदिराचे व्यवस्थापकिय विश्‍वस्त रमेश शानभाग यांनी केले आहे.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular