Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीपोलीसांच्या संगनमताने शिवसेनेची नाहक बदनामी : चंद्रकांत जाधव

पोलीसांच्या संगनमताने शिवसेनेची नाहक बदनामी : चंद्रकांत जाधव

वडूज :   शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख विश्वास चव्हाण व महिला पदाधिकारी यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामागे संबंधित डॉक्टर व पोलीसांनी संगनमताने शिवसेनेची बदनामी केली आहे. या बदनामीचा शिवसेनेच्या स्टाईलने पोलखोल केला जाईल असा इशारा जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी दिला आहे.
वडूज येथील अस्थिरोग तज्ञ डॉ. विवेकानंद माने यांनी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे  जिल्हाप्रमुख विश्‍वासराव चव्हाण व महिला पदाधिकार्‍यांच्या विरोधात दिलेल्या तथाकथीत खंडणीच्या तक्रारीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्यावतीने छोटेखानी मोर्चा काढून पोलीसांना निवेदन दिले. त्यावेळी जिल्हाप्रमुख  श्री. जाधव बोलत होते. यावेळी  संजय भोसले, रामभाऊ रैनाक, युवराज पाटील,  बाळासाहेब जाधव, सचिन भिसे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
श्री. जाधव म्हणाले,  शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षाच्या जिल्हाप्रमुख व महिला पदाधिकारी यांच्यासह इतर शिवसैनिकांवर राजकीय हेतू साधून तसेच पोलीस अधिकार्‍यांना हाताशी धरून त्यांच्यावर खंडणी सारखे भयंकर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  संरक्षण कक्षाचे श्री. चव्हाण यांनी वडूज पोलीस ठाण्यात दि. 11 डिसेंबर रोजी  डॉ. माने यांच्या चारुशीला हॉस्पिटलमध्ये दि. 06 /04/ 2014 रोजी रंजना देशमुख यांचे ऑपरेशन झाले असल्याची माहिती तसेच डॉक्टर यांनी निष्काळजी पणे व पेशन्टची दिशाभूल केली असल्याची तक्रार केली होती.
दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याचा तपास होऊन ताबडतोब संबंधितावरील खोटे गुन्हे रद्द करण्यात यावेत आणि पोलीस आधिकर्‍यंावरती पदाचा चुकीचा अधिकार दाखवून कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता गुन्हा नोंद करणार्‍या अधिकार्‍यावर पक्षाची व व्यक्तीचा बदनामी करणेचा गुन्हा नोंद करून घेतला आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करावी अन्यथा शिवसेना स्टाईलने संबंधित वैद्यकीय व्यवसायिक व खोटे गुन्हे दाखल करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांविरोधात आंदोलन छेडले जाईल.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular