सातारा : सातारा जनता बँकेच्या अत्यल्प व्याजदराच्या वाहन तारण योजनेचा ग्राहकांनी फायदा घ्यावा. जनता सहकारी बँक लि. साताराचे सभासद व माजी सेवक मच्छिंद्र तपासे यांना होंडा अमेझ गाडीचे वितरण बँकेचे चेअरमन माधव सारडा यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. बँकेतर्फे फक्त साडेनउ टक्के व्याजदाराने कर्जवितरण सुरु आहे, अशी माहिती जनता सहकारी बँकेचे चेअरमन माधव सारडा यांनी दिली. तपासे यांनी संचालक सदस्य व अधिकारी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद देवून बँकेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. सदर प्रसंगी मान्यवर सभासद तसेच भागधारक, पॅनल प्रमुख व संचालक विनोद कुलकर्णी, व्हा. चेअरमन अविनाश बाचल, संचालक अतुल जाधव, बँकेचे व्यवस्थापक प्रशांत शास्त्री, उपव्यवस्थापक मच्छिंद्र जगदाळे, वसुली विभाग प्रमुख रविंद्र डांबे, बँकेच्या सातारा शाखेचे शाखाधिकारी विजय देवी व रामेश्वर खंडेलवाल आदी सेवक वर्ग उपस्थित होता.
साडेनऊ टक्के व्याजदराने वाहन तारण कर्ज घ्या : माधव सारडा
RELATED ARTICLES