Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीतालुक्याच्या विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही : ना. एकनाथ शिंदे

तालुक्याच्या विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही : ना. एकनाथ शिंदे

महाबळेश्‍वरः  तालुक्याचा दुर्गम भागाकडे आघाडीने मागील पंधरा वर्षात पुर्णपणे दुर्लक्ष केल्याने ग्रामीण भाग विकासापासुन वंचित राहीला आहे. विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी शिवसेनेने विकास कामांचे प्रस्ताव दयावेत. तालुक्याच्या विकास कामांना निधी कमी पडु देणार नाही अशी ग्वाही तालुक्याचे सुपुत्र बांधकाम मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी दिली.
महाबळेश्‍वर तालुक्यातील दरे हे गाव ना. एकनाथ शिंदे यांचे मुळ जन्मगाव आहे दोन दिवसांच्या विश्रांतीसाठी सहकुटूंब ते आपल्या गावी आले होते. आज सकाळी शिवसनेनेचे माजी नगराध्यक्ष डी.एम.बावळेकर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने ना. एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शिष्ट मंडळात शिवसनेनेचे जेष्ठ धोंडीराम बापु जाधव, जिल्हा परिषद सदस्या प्रणिती जंगम, विशाल सकपाळ, आनंद धनावडे, संजय शेलार, सिताराम जंगम हेही होते. सेनेच्या शिष्टमंडळाने तालुक्यातील काही गावांच्या विकासाचे प्रस्ताव सादर केले. त्या वेळी शिष्टमंडळाशी ना शिंदे हे बोलत होते. ते म्हणाले की, आघाडीने केवळ मताचे राजकारण केले ग्रामिण भागातील जनतेची फसवणुक करून केवळ मते मिळविली. परंतु विकास केला नाही हा विकासाचा अनुशेष भरून काढला जाईल. या साठी शिवसेनेने ग्रमिण भागातील विविध विकास कामांचे प्रस्ताव सादर करावेत. ज्या विभागाचे प्रस्ताव असतील त्या त्या विभागातील मंत्री महोदयां बरोबर बैठक लावुन विकास कामे तातडीने मंजुर केली जातील. या विकास कामांसाठी आगामी अर्थसंकल्पात निधीची तरतुद केली जाईल असे आश्‍वासन ना. एकनाथ शिंदे यांनी दिले.
ना.एकनाथ शिंदे यांनी मंत्रीपद स्विकारल्या नंतर तातडीने शिवसागर जलाशयावर कोट्ोशी ते आमशी पुलाच्या बांधकामासाठी 28 कोटी रूपये मंजुर करून निधी उपलब्ध करून दिला. हा पुल आता बांधुन तयार झाला आहे. या पुला प्रमाणे तापोळा ते गाढवली या ही पुलाला मंजुरी देवनु या पुलाच्या बाधंकामासाठी 138 कोटी रूपयांचा निधी मंजुर केला आहे बांधुन तयार झालेल्या पुलाचे उद्घाटन व नविन पुलाचे उद्घाटन समारंभ जानेवारी अखेर करण्यासाठी त्यांनी ना. चंद्रकांत पाटील यांचे सोबत येण्याचे मान्य केले. तसेच या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांनीही यावे अशी विनंती करणार आहे. तापोळा ते गाढवली हा पुल वरली सीलिंक प्रमाणे असुन त्याची लांबीही भरपुर आहे. या पुलावर पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी डेक तयार करण्यात येणार आहे. हा पुल पर्यटकांचे खास आकर्षण ठरणार असुन या भागातील लोकांच्या रोजगारात वाढ होण्यास मदत होणार आहे. तापोळा भागाच्या विकासाचा आराखडा तयार करा या आराखडयातील विकास कामांना निधी  पुरविण्याची जबाबदारीही ना. एकनाथ शिंदे यांनी घेतली. महाबळेश्‍वर तापोळा या रस्त्याचे रूंदीकरण व डांबरीकरणासाठी लागणारा निधी अर्थ संकल्पात मंजुर करण्यात येईल. असे सांगुन या भागातील शाळा रस्ते गटारे गावातील अंतर्गत विकास कामे मंजुर करण्यासाठी पुर्नवसन मंत्री यांचे बरोबर तातडीची बैठक आयोजित करण्याचे आश्‍वासनही या वेळी ना. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळास दिले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular