फलटण : बाळशास्त्रींनी अवघ्या 34 वर्षाच्या जीवनप्रवासात ज्ञानसंपादन, ज्ञाननिर्मीती व ज्ञानप्रसाराचे कार्य केले. यातूनच सामाजिक परिवर्तनाचा मार्ग सुरु झाला. स्वातंत्र्यपूर्व काळातील पत्रकारिता व आजच्या पत्रकारितेत परिस्थितीनुसार धोरणात्मक व गुणात्मक बदल झाले आहेत. हे बदल आवश्यक असताना पत्रकारितेचे अस्तित्व व हेतू याला तडा जातो आहे की काय असा सध्या प्रश्न निर्माण होत आहे. या परिस्थितीत पत्रकारांनी बाळशास्त्रींच्या पत्रकारितेचे हेतू व उद्दिष्ट जपण्याचे काम केले तर सध्याच्या पत्रकारितेला वेगळा आयाम मिळेल, असे मत कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.देवानंद शिंदे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी व वृत्तपत्र विद्या विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, पोंभुर्ले ग्रामस्थ व जांभेकर कुटुंबिय यांच्या सहकार्याने मराठी भाषेतील पहिल्या दर्पण वृत्तपत्राचा वर्धापनदिन म्हणजेच राज्यस्तरीय पत्रकार दिनफ व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारितेचा गौरव समारंभ पोंभुर्ले, ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग येथील दर्पण सभागृहात डॉ.देवानंद शिंदे यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ होते. यावेळी व्यासपीठावर देवगड पंचायत समितीच्या सभापती सौ.जयश्री आडीवरेकर, पोंभुर्ले गावचे सरपंच सादिक डोंगरकर, संस्थेचे उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव, कार्यकारी विश्वस्त विजय मांडके, शिवाजी विद्यापीठ वृत्तपत्र विद्या विभाग प्रमुख डॉ.निशा पवार, ज्येष्ठ पत्रकार उत्तम वाडकर, सुभाष धुमे, सुधाकर जांभेकर, शांताराम गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.शिंदे पुढे म्हणाले, काळाच्या ओघात अनेक प्रतिभावंत जन्माला येतात. पण प्रत्येक प्रतिभावंत इतिहासात आपले नाव कोरु शकत नाहीत. मात्र बाळशास्त्रींनी बौद्धिक सामर्थ्याच्या जोरावर पत्रकारिता, शिक्षण, संशोधन, समाजजागृती यामध्ये उल्लेखनीय कार्य करुन आपले नाव अजरामर केले. त्यांचा दर्पणफ ते दिग्दर्शनफ अफाट कर्तृत्त्वाचा, सर्व समावेशक, सामाजिक, शैक्षणिक, वृत्तपत्र क्षेत्रातील आदर्श प्रवास होता. त्यांच्या या कार्याकडे पाहून व्यासंगाची परिभाषा समजते. त्यांनी दर्पणफ ला लोकसंवादाचे प्रभावी माध्यम म्हणून विकसित केले. ज्ञान उत्पादन, ज्ञान प्रसाराचे कार्य केले. युवकांच्यात स्वराष्ट्रधर्म जागवला. दर्पणफने समाजाला आत्मपरिक्षण करायला लावले. निर्णय घेण्यास भाग पाडले. आपल्या पत्रकारितेतून असे घडते का? याचा शोध पत्रकारांनी घ्यावा, असेही आवाहन डॉ.शिंदे यांनी केले. आज इंटरनेटच्या माध्यमातून माहितीचा सागर खुला झाला आहे पण अज्ञानाची खोलीही तितकीच वाढलेली आहे. माहिती व तंत्रज्ञानाचा आधार घेवून पत्रकारितेला वेगळे वळण दिले जात आहे. युवा पत्रकारांनी बाळशास्त्रींना अभ्यासावे. जांभेकरांचे चरित्र मोठ्या प्रमाणावर समाजासमोर यायला हवे. आशेचा किरण उगवून परिवर्तनाची पहाट होत असते. पत्रकारांचे कार्य हे दीपस्तंभाप्रमाणे असून त्यांनी बाळशास्त्रींचे विचार आणि वारसा जपण्यासाठी सदैव कटीबद्ध रहावे, असेही डॉ.शिंदे यांनी नमूद केले. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या संस्थेचे स्मारक उभारणीतील परिश्रम कौतुकास्पद व प्रेरणादायी आहेत. संस्था पत्रकारांच्या कल्याणासाठी राबवत असलेले उपक्रमही अभिनंदनीय आहेत. पोंभुर्ले हे गाव आदर्श गाव बनवण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी लवकरच काम सुरु केले जाईल. तसेच दर्पण सभागृहात सुसज्ज वाचनालयासाठी शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून ग्रंथरुपी मदत केली जाईल, असेही डॉ.शिंदे यांनी यावेळी अवर्जून सांगीतले. अध्यक्षीय भाषणात रविंद्र बेडकिहाळ यांनी, राज्यात प्रथमच ज्येष्ठ व गुणवंत पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दर्पणफ पुरस्कार देण्यास 1993 मध्ये सुरुवात केली. गेली 25 वर्षे हे पुरस्कार नियमितपणे दिले जातात. दर्पणफकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे पोंभुर्ले येथील स्मरणकार्यही 1993 रोजीच सुरु झाले. त्यालाही यावर्षी 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. ऐतिहासिक अशा या दोन्ही रौप्यमहोत्सवी उपक्रमानिमित्त सामाजिक कृतज्ञता म्हणून संस्थेतर्फे दर्पणकारांचा वारसा जपलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्रातिनिधीक सत्कार म्हणून या जिल्ह्यातील स्थानिक दैनिक व साप्ताहिक वृत्तपत्रांचे संपादक, मोठ्या वृत्तपत्रांचे जिल्हा आवृत्ती प्रमुख, वृत्त वाहिन्यांचे जिल्हा प्रतिनिधी व स्थानिक केबल प्रसारण प्रतिनिधी यांचा विशेष दर्पण सन्मान आयोजित केला असल्याचे सांगून दर्पण कारांच्या कार्याचा त्यांची कर्मभूमी असलेल्या मुंबईत यथोचित सन्मान होणे गरजेचे आहे. त्यासाठी मुंबई विद्यापीठाने पुढाकार घ्यावा. बाळशास्त्रींचे तैलचित्र मुंबई विद्यापीठात सन्मानाने लावावे. मराठी पत्रकारांची पंढरी असलेले पोंभुर्ले हे गाव राज्यात मॉडेल व्हिलेजफ व्हावे यासाठी आपण संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. यासाठी व बाळशास्त्रींचे स्मरणकार्य असेच पुढे सुरु ठेवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांनीही सहकार्य करावे, असे आवाहनही बेडकिहाळ यांनी केले. प्रारंभी बाळशास्त्रींची पालखी प्रमुख पाहुणे, उपस्थित पत्रकार व ग्रामस्थांनी दर्पणफ सभागृहात आणल्यानंतर प्रमुख मान्यवरांचे हस्ते बाळशास्त्रींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती असणार्या दर्पणफ स्मरणिकेचे प्रकाशन डॉ.शिंदे यांचे हस्ते करण्यात आले. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारितेचा गौरव म्हणून देवगड तालुका पत्रकार संघाचे सरचिटणीस दयानंद मांगले, पत्रकार संतोष कुलकर्णी, गणेश आत्रेकर, हर्षवर्धन धारणकर, नंदकिशोर महाजन, राजेंद्र खांडाळेकर, उत्तम वाडकर, श्रीमती संजीवनी देसाई, सौ.सीमा मराठे, आनंद लोके, महेश खोत, दिलीप हिंदळेकर, वसंत केसरकर, दयाळ कांबळे, नितीन तळेकर, आबा खवणेकर, मनोज माळकर, सौ.दिव्या वायंगणकर, रवि गावडे, विजय गावकर, राजन नाईक, निलेश जोशी, विजय पालकर, विशाल रेवडेकर, राजन चव्हाण, सिद्धेश आचरेकर, सुभाष देवरुखकर, विलास कुडाळकर आदी पत्रकार, संपादकांचा विशेष दर्पण सन्मान मानपत्र, बाळशास्त्रींचे छायाचित्र, शाल, चरित्रग्रंथ देवून डॉ.शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
आजच्या पत्रकारितेत परिस्थितीनुसार धोरणात्मक व गुणात्मक बदलः डॉ.देवानंद शिंदे ; पोंभुर्ले येथे राज्यस्तरीय पत्रकार दिन उत्साहात साजरा
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय मांडके यांनी केले. सूत्रसंचालन सौ.अलका बेडकिहाळ यांनी केले तर आभार बापूसाहेब जाधव यांनी मानले. कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, कोल्हापूरचे पत्रकारिता अभ्यास केंद्रप्रमुख वसंत सप्रे व राजेंद्र मांडवकर, सातारा येथील डॉ.उल्हास आठवले, स्टेट बँकेचे निवृत्त अधिकारी श्रीकांत हळबे, मुंबई विद्यापीठाचे मुख्य अभियंता विनोद पाटील, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे विश्वस्त गजानन पारखे (पुणे), रामभाऊ सुतार (इचलकरंजी), निलेश सोनवलकर (फलटण), शिवाजी विद्यापीठ वृत्तपत्र विद्या विभागातील प्रशिक्षणार्थी, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे ग.गो.जाधव पत्रकारिता अभ्यासकेंद्राचे विद्यार्थी, पोंभुर्ले ग्रामपंचायत सदस्य, विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी व सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर, पोंभुर्ले ग्रामस्थ, जांभेकर कुटुंबीय उपस्थित होते.
RELATED ARTICLES