Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीसमाजाची सेवा हेच कर्तव्य सोशल ग्रुपचे आद्य कर्तव्य : सौ. वेदांतिकाराजे

समाजाची सेवा हेच कर्तव्य सोशल ग्रुपचे आद्य कर्तव्य : सौ. वेदांतिकाराजे

साताराः  कोणतेही काम ध्येय आणि जिद्दीशिवाय पुर्ण होवू शकत नाही. गेली 11 वर्ष अविरतपणे समाजसेवेचे व्रत जोपासणार्‍या कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून असंख्य आरोग्य शिबीरे, पर्यावरण रक्षण, प्लास्टीक मुक्ती, स्त्री सबलीकरण आदी विविध उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. समाजसेवा हाच कर्तव्य सोशल ग्रुपच्या स्थापनेचा उद्देश आणि ध्येय होते. समाजसेवेचे ध्येय कधीही पुर्ण होवू शकत नाही मात्र, लोकांच्या चेहर्‍यावरील समाधान म्हणजेच ध्येयपुर्ती असून या ध्येयपुर्तीसाठी आणि समाजसेवेसाठी कर्तव्य सोशल ग्रुप अखंडपणे कार्यरत राहील, असे प्रतिपादन कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.
स्व. आ. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले यांच्या स्मरणार्थ कर्तव्य सोशल ग्रुपच्या वतीने भोंदवडे (ता. सातारा) येथील गुरुकूल इंग्लिश मिडीयम स्कूल येथे आयोजित मोफत मोतीबिदू तपासणी व शस्त्रक्रीया शिबीराच्या उदघाटनप्रसंगी सौ. वेदांतिकाराजे बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. कमला जाधव, पंचायत समितीच्या सदस्या सौ. विद्या देवरे, अरविंद जाधव, एकनाथ पवार, माधवराव कदम, एकनाथ गेणू पवार, मुख्याध्यापिका सौ. विद्या पवार यांच्यास आजी, माजी सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना सौ. वेदांतिकाराजे म्हणाल्या की, कर्तव्य सोशल ग्रुप गेली 11 वर्ष अविरतपणे कार्यरत आहे. आरोग्य शिबीर अथवा पर्यावरण रक्षणासाठी घेतलेल्या विविध उपक्रमात नागरिकांचा सहभाग हा खूपच प्रेरणादायी ठरला आहे. मोतीबिंदू शिबीरांमुळे आजपर्यंत हजारो लोकांना नवी दृष्टी मिळाली आहे. जयपूर फूट वाटप उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांना जगण्याची नवी दिशा मिळाली आहे.
शिबीरात 300 रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली. 130 रुग्णांना चष्मे वाटप करण्यात आले तर, 56 रुग्णांना मोतीबिंदूच्या मोफत शस्त्रक्रीयेसाठी पुण्याला पाठवण्यात आले. तसेच यावेळी गुरुकूल इंग्लिश मिडीयम स्कूलने सुरु केलेल्या एकतारा क्रीडा प्रबोधिनी अकॅडमी अंतर्गत क्रिकेट, व्हॉलीबॉल स्पर्धा आणि स्पर्धापरिक्षा व स्कॉलरशिप मार्गदर्शन केंद्राचे सौ. वेदांतिकाराजे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular