पाटण : कोयना धरण परिसरासह पाटण,कराड व चिपळूण तालूक्यातील अनेक ठिकाणी आज 3.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाचे धक्के आज मंगळवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास जाणवले.
या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून 22. 4 किलोमीटर अंतरावर वारणा खोर्यात जावळे गावच्या दक्षिणेला चार कि. मी. अंतरावर होता. त्याची खोली 9 कि. मी. अंतरावर होती. पाटण, कराड, चिपळूण, अलोरे, कोयना या विभागात या भूकंपाचा धक्का जाणवल्याची माहिती भूकंप मापन केंद्र कोयनानगर यांनी दिली. या भूकंपामध्ये कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झालेली नाही.