सातारा : सातारा जिल्हा आयटक व मित्र संघटनांच्यावतीने अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रा. पं. कर्मचारी, पथ विक्रेते यांच्या प्रलंबीत मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.
जिल्हाधिकारी श्वेता सिंघल व जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंगणवाडी कर्मचार्यांना ऑक्टोबर 2017 पासून मानधन वाढ देण्यात यावी, गेल्या एक महिन्याची आहार बिले, तसेच 2 ते 3 वर्षाची टी. ए. डी. मिळाला नाही. त्या रक्कमा तातडीने मिळाव्यात, मानधन सर्वांना वेळेत व नियमित मिळावे, अद्यापही काही महिलांनाा जून 2017 पासूनचे मानधन मिळाले नाही, याची गांभीर्याने नोंद घ्यावी, अंगणवाडी सेविका यांनी स्वत:च्या मानधनावर कर्ज काढून अंगणवाडीत आहार देणे, केंद्राची कामे करणे आदी कामे केली आहेत. त्यांना कर्जमाफी द्यावी, खाडी गणवेशसाठी 100 रुपये, परिवर्तन निधी 2 हजार मिळावा, नागरी प्रकल्पासाठी सुसज्ज अंगणवाडी केंद्रे बांधून मिळावीत, मिनीला मोठ्या अंगणवाडीचा दर्जा मिळावा, मदतनिस यांना सेविकेच्या 75 टक्के मानधन मिळावे, संप काळातील मानधन तातडीने मिळावे, गट प्रवर्तकांना 10 हजार मानधन सुरु करावे, आरोग्य उपकेंद्रातील अंशकालीन स्त्री परिचार यांना दरमहा 1200 रुपये मानधन मिळते त्यात वाढ करुन 6 हजार करावे, शालेय पोषण आहार तयार करणार्या कर्मचार्यांना5 हजार मानधन द्यावे, ग्रा. पं. कर्मचार्यांना पेन्शन लागू करावी, मुबंई उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे शहर फेरीवाल्या समिती स्थापन करुन हॉकर्स झोन तयार करावेत आदी मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात प्रभारी जिल्हाध्यक्ष शैकतभाई पठाण, संघटक अॅड. कॉ. सयाजीराव पाटील, सुजाता रणनवरे, कॉ. शिवाजीराव पवार, कॉ. शामराव चिंचणे, निमंत्रक सुरेखा शिंदे, निर्मला पाटील, मालन जाधव, विमल चुनाडे सातारा हौसिंग संजय पवार तसेच सेविका मदतनीस ग्राप. प. संघटने शहराध्यक्ष कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंगणवाडी सेविकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
RELATED ARTICLES