मायणी : दिव्यांग व्यक्तींना आज चालताना, प्रवास करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे अशा लोकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी तसेच कोणाचाही आधार न घेता प्रवास करता यावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन फ्रेंड्स ग्रुप बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केले.येथील मुस्ताक बागवान या दिव्यांग व्यक्तीला संस्थेमार्फत कृत्रिम पाय देण्यात आला.यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
महेश जाधव म्हणाले मुस्ताक बागवान हे दिव्यांग आहेत .त्यांचा उजवा पाय गुडघ्यापासुन खाली नाही.असे असलेतरी आज ते स्वतःसह स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.दोन चाकी वाहणांसह कोणतेही चार चाकी वाहन दिव्यांग असून सुद्धा ते चालवत असतात वेळप्रसंगी स्वतःचा व कुटुंबाचा दैनंदिन खर्च भागवण्यासाठी कोणतेही काम करण्यास मागेपुढे पाहत नाहीत म्हणून आज संस्थेमार्फत त्यांना कृत्रिम पाय देण्यात आला. समाजामध्ये आज अनेक दानशूर व्यक्ती व संस्था कार्यरत आहेत यांच्याकडून वेळोवेळी आर्थिक व वस्तुरूपात मदत घेवून संस्था समाजातील गरीब गरजूंना मदत करत असते. यापुढे परिसरातील दिव्यांगाना संस्थेमार्फत मदत करनार असल्याचे जाधव म्हणाले.
यावेळी मायणी पत्रकार संघाचे संस्थेचे सचिव संदीप कुंभार ,संस्थेचे संस्थापक संचालक व नवनिर्वाचित पोलिस पाटील प्रशांत कोळी,मिलींद महामुणी,गणेश पाटिल,सुदाम ठोंबरे,उमेश लिपारे,विश्वास गुरव,पोपट जाधव,वाहक देवकते आदि मान्यवर उपस्थित होते.
दिव्यांगांना फ्रेंडस ग्रुप मदत करणार : महेश जाधव
RELATED ARTICLES