Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीभाकरवाडी अंधशाळेच्या मुख्याध्यापकाची पोलीस कोठडीत रवानगी 

भाकरवाडी अंधशाळेच्या मुख्याध्यापकाची पोलीस कोठडीत रवानगी 

कोरेगाव: भाकरवाडी, ता. कोरेगाव येथील शिवनेरी बहुद्देशीय विकास संस्थेच्या प्रबोधन निवासी अंध विद्यालय व प्रशिक्षण केंद्राचा मुख्याध्यापक तुळशीराम अंकुश चांदणे याला एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. अंध विद्यार्थीनीवर केलेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात त्याला सातारच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते.
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वैद्यकीय व सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा कुंभार यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशाप्रमाणे शुक्रवारी दुपारी अंधशाळेला भेट देऊन पाहणी केली. यावेळी अंध विद्यार्थीनींशी त्यांनी संवाद साधला. त्यांनी शिवनेरी बहुद्देशीय विकास संस्थेला मुख्याध्यापक चांदणे याच्यावर कारवाई करण्यासाठी पत्र दिले आहे. वृत्तपत्रातील बातम्यांच्या संदर्भाने प्रभारी जिल्हा समाजकल्याण अधिकारी जावेद शेख यांनी समाजकल्याण आयुक्त नितीन पाटील यांना माहिती कळवली आहे.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular