Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीबँको पुरस्कार -2017 ने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सन्मानित

बँको पुरस्कार -2017 ने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सन्मानित

साताराः अविज पब्लिकेशन, कोल्हापूर आणि गॅलेक्सी इन्मा प्रा.लि. पुणे यांचेवतीने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस संपुर्ण भारतामधील जिल्हा बँकेचा व्यवसाय रु .5 हजार कोटी पेक्षा जास्त असणारी बँक याविभागात बँको पुरस्कार – 2017 ने सन्मानित करणेत आले .
सदर पुरस्कार हैद्राबाद येथे अविज पब्लिकेशनचे मुख्य संपादक अविनाश शिंत्रे, गॅलेक्सी इन्माचे संस्थापक अशोक नाईक यांचे प्रमुख उपस्थितीत व तेलंगना राज्याचे उपमुख्यमंत्री ना.महंमद अली यांचे हस्ते बँकेचे उपाध्यक्ष सुनिल माने, संचालक नितीन जाधव(पाटील), प्रकाश बडेकर, सरव्यवस्थापक संजयकुमार जाधव यांनी स्विकारला.यावेळी ना. महंमद अली यांनी महाराष्ट्रातील गौरवशाली परंपरा असलेली व सहकारी बँकिंग क्षेत्रामधील आदर्श बँक म्हणून बँकेचा विशेष उल्लेख केला.
सातारा जिल्हा बँकेस यापूर्वी सन 2011, 2014 मध्ये बँको पुरस्कार व सन 2016 मध्ये बँको टेक्नॉलॉजी पुरस्कार या पुरस्कारांनी गौरविणेत आले आहे
आदर्शवत व उज्वल परंपरा, पारदर्शक कारभारतसेच उत्कृष्ठ कार्यप्रणाली, यामुळे बँकेची ख्याती देशात झाली आहे . या पुरस्कारामुळे बँकेच्या लौकीकामध्ये भर पडली आहे. जिल्हयातील सर्वसामान्यांचे आर्थिक उन्नतीसाठी राबवित असलेल्या विविध कर्ज योजना, प्रभावी वसुली यंत्रणा, उत्कृष्ठ निधी व्यवस्थापन, शुन्य टक्के निव्वळ एन.पी.ए., दर्जात्मक कामकाज, गुणवत्ता तसेच आधुनिक बँकिंगद्वारे ग्राहकाभिमुख सेवा यामुळे आयएसओ 9001-2008 मिळालेले मानांकन, लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये झालेली नोंद व सामाजिक बांधिलकी कायम जपत असलेने सातारा जिल्हा बँकेने, बँकिंग क्षेत्रामध्ये वेगळा ठसा उमटविलेला आहे .
यावेळी महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून आलेले विविध जिल्हा बँकांचे, इतर सहकारी बँकांचे  व पतसंस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच सातारा जिल्हा बँकेचे अधिकारी श्रीकांत मोहिते, संदिप शिंदे, रविंद्र उंबरकर उपस्थित होते.
या पुरस्काराबद्दल बँकेचे अध्यक्ष आ.श्रीमंत छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले, संचालक व विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, संचालक लक्ष्मणराव पाटील (माजी खासदार), आ.शशिकांत शिंदे,विलासराव पाटील (माजी सहकार मंत्री),विक्रमसिंह पाटणकर (माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री),  दादाराजे खर्डेकर यांचेसह सर्व संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक एम .व्ही .जाधव सर्व विभागांचे व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सेवक वर्ग, गटसचिव यांनी अभिनंदन करुन बँकेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular