सातारा: सातारा शहर शिवसेनेच्या वतीने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी सकाळी 10 वाजता जनसंपर्क कार्यालयात मा बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पोवई नाका येथे रॅली ने जाऊन छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले .
दुपारी 12 वाजता सातारा जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान करण्यात आले. सायंकाळी 7.30 वाजता सौ लक्ष्मीबाई पाटील वसतिगृहातील मुलीना फळ वाटप व चष्मे वाटप करण्यात आले.
यावेळी जेष्ठ शिवसैनिक माजी उप जिल्हा प्रमुख अण्णा देशपांडे, उप जिल्हा प्रमुख हरिदास जगदाळे , शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे , शहर प्रमुख निमिष शहा, तालुका प्रमुख दत्तात्रय नलावडे, आकाश जाधव तसेच सर्व माजी आजी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.
उत्साह पूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्यामुळे शहर शिवसेनेत व शिवसैनिकांच्या उत्साह संचारला होता सर्व उपस्थित पदाधिकार्यांचे व शिवसैनिकांचे आभार शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे व शहर प्रमुख निमिष शहा यांनी मानले .