सातारा-: महाराष्ट्र नगरपालिका अधिनियमातील अकाउंट कोडचे आणि अधिनियमाचे उल्लंघन करुन नगराध्यक्षांची सही न घेता सातारा नगरपालिका मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी लाखो रुपयांची बिले काढली असल्याचा धक्कादायक आरोप सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी आज पत्रकार परिषदेत पुराव्यानिशी केला आहे. तसेच मुख्याधिकार्यांना निलंबित करुन फौजदारी गुन्हा दाखल करण्याची ही मागणी त्यांनी यावेळी केली.
सुशांत मोरे पुढे म्हणाले,सातारा विकास आघाडीची सत्ता येवुन एक वर्ष पुर्ण झाले आहे.या वर्ष भरात सातारा पालिकेत कारभाराचा सावळा गोंधळ सुरु आहे.मोठ्या प्रमानात बोगस बिले काढली जात आहेत.मात्र पुराव्या अभावी काहीच करता नाही अशी परिस्थिती होती.मुख्याधिकारी हे प्रशासकीय अधिकाराचा गैरवापर करत संपुर्ण यंत्रणा दबावाखाली आणुन नगराध्यक्षाना अधांरात ठेवुन बिले काढली असुन याची माहीतच माहीतीचा अधिकारात उघड झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तरी मुख्याधिकारी शंकर गोरे यांना तत्काळ निलंबित करुन त्यांचावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
नगराध्यक्षांची स्वाक्षरी न घेताच लाखो रुपयांची बिले काढली :- सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे ; मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
RELATED ARTICLES