Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीअनाथ मुलांना अंगणवाडीत बसू न देणाऱ्या सेविका, मदतनीस वर कारवाईची मागणी ;...

अनाथ मुलांना अंगणवाडीत बसू न देणाऱ्या सेविका, मदतनीस वर कारवाईची मागणी ; या मुलांचे पालकत्व प. स. सदस्य सुरेश पानसकर, संतोष गिरी यांनी स्विकारले.

 

पाटण : शिक्षणापासून कोणाला वंचित ठेवता येत नाही. अंगणवाडीत तर अशा मुलांना प्रथम प्राधान्य असते. परंतु, पाटण मधील लायब्री चौकातील अंगणवाडीत क्रमांक २८३ मध्ये अनाथ दोन लहान मुलांना बसू दिले जात नाही. कारण त्यांच्या आई-वडीलांचे HIV ने निधन झाले आसे म्हणले जाते. याबाबतीत मुलांचा रिपोर्ट निल आहे. त्यांना कोणतेही बाधा नाही. आणि हा रोग काही संसर्गजन्य नाही. तरी देखील त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले आहे. याला कारणीभूत केवळ अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत. या अंगणवाडीत अनाथ मुलांना बसू दिले जात नाही. हा अन्याय असुन या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी. अशी मागणी पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर यांनी केली. दरम्यान या दोन अनाथ मुलांचे पालकत्व पंचायत समिती सदस्य संतोष गिरी व सुरेश पानस्कर यांनी घेतले.
पाटण पंचायत समितीची मासिक सभा पंचायत समिती सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी सभापती उज्वला जाधव यांनी सर्वांचे स्वागत करुन सभेस प्रारंभ केला. यावेली जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भंडारे सर, गटविकास अधिकारी संजीव गायकवाड, सा. गटविकास अधिकारी वाघ, उपसभापती राजाभाऊ शेलार हे उपस्थित होते.
सभेच्या सुरवातीस ज्ञात अज्ञात व्यक्तिंना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर घनकचरा निर्मुलन व गांडुळ खत प्रकल्प मल्हारपेठ ग्रामपंचायत मध्ये सुरु होत आहे. त्यासाठी प्रयत्न करणारे पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी यांचा अभिनंदनाचा ठराव पं.स.सदस्य सुरेश पानस्कर यांनी मांडला.
पं.स. सदस्यांनी ग्रामपंचायत विभागाशी निगडीत अनेक प्रश्न उपस्थित केले त्याबाबत खुलासा करताना भंडारे साहेब यांनी ग्रामपंचात विभागातील विविध गोष्टींची माहिती दिली. जि.प. अंतर्गत १४९६ ग्रामपंचायती आहेत. चौदाव्या वित्त आयोगातील निधीचा योग्य वापर झाला पाहिजे. या निधीचा आराखडा तयार करावा. राजकारणातुन काम बदलु नयेत. तसेच लवकरच ई ग्राम सॉफ्टवेअर इनस्टोर करणार असुन ग्रामपंचायतीचे व्यवहार अॉनलाईन होणार आहेत. जुनी कागदपत्रे जतन करुन ठेवण्यासाठी अॉनलाईन रेकॉर्ड करण्यात येणार आहेत. स्वच्छ भारत अंतर्गत शौचालयाची कामे नरेगा मधुन करण्यात येतील. अशी माहिती त्यांनी दिली.
एकात्मिक बाल विकास विभागाचा आढावा दिला. त्यावेली आहार बिलं अद्याप निघालेली नाहीत. अंगणवाडीचा मुलांना आहार वाटप होत नाही. आहाराची बिल लवकरात लवकर काढावित अशी मागणी पं.स.स. रुपाली पवार यांनी केली. आरोग्य विभागाचा आढाला देताना आरोग्य अधिकारी दीपक सालुंखे यांनी कँन्सर तपासणी साठी कँम्प घेणार आहे याची माहिती दिली. पाटण तालुक्यात पल्स पोलिओ ९९ टक्के पुर्ण झाले आहे. माजगाव आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य कर्मचारी अद्याप आलेले नाहीत. उपकेद्रांस कुलुप असते. रात्रीच्या वेली आरोग्य केन्द्रांत मुक्कांमी कर्मचारी नसतात. तसेच डिलीवरीसाठी महिलेला शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते आणि महिलेस जेवण ही दिले जाते परंतु आरोग्य केद्रांत या सुविधा मिलत नाहीत याउलट गोरगरिब जनतेकडून डिलीव्हरी साठी पैसे घेतले जातात या सर्व समस्या पं.स.स. रुपाली पवार यांनी मांडल्या. तसेच रुग्ण कल्याण समिती ची चाफल भागात अद्याप एकही मिटींग झाली नाही ती का झाली नाही अशी विचारणा ही पं.स.स. रुपाली पवार यांनी केली.
विद्युत महावितरण चा आढावा आढाला देताना, पुनर्वसित गावांमध्ये ३ पेज कनेक्शन द्यावे अशी मागणी पं.स. उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी केली. पंचायत समिती चा ग्रामपंचायत विभागाचा आढावा देताना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पाटण तालुक्यात १ कोटी ४० लाख ३४ हजार अनुदान वाटप केल्याची माहिती देण्यात आली.
अनेक विभागाच्या अधिकार्यांची अनुउपस्थिती होती त्यामुले थोडक्यात सभा आटोपती घेतली. सभेचा शेवटी पं.स. उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी आभार मानले.

 

सभागृह म्हणजे आवो जावो घर तुम्हारा नाही…
अधिकार्यांना वेळेचे भान नाही. केव्हा ही या कुठे ही जा. अधुन मधुन सभागृहात येणे ही शिस्त नाही. प्रोटोैकॉल सर्वांनी पाळावा. सभागृह म्हणजे आवो जावो घर तुम्हारा नाही अशी तंबी उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी दिली.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular