Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीपोवई नाक्यावरील ग्रेडसेपरेटरचे आज विविध मान्यवरांच्या हस्ते भूमीपुजन

पोवई नाक्यावरील ग्रेडसेपरेटरचे आज विविध मान्यवरांच्या हस्ते भूमीपुजन

सातारा : पोवई नाक्यावरील  ग्रेडसेपरेटरच्या बांधकामाचे भूमीपुजन आज 24 फेब्रुवारी रोजी पावेई नाका येथे विविध मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
या भूमीपुजनास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजय शिवतारे, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीव नाईक-निंबाळकर, सर्वश्री आमदार  पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, शशिकांत शिंदे, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, शंभुराज देसाई, बाळासाहेब पाटील, जयकुमार गोरे, मकरंद पाटील, दीपक चव्हाण, आनंदराव पाटील, नरेंद्र पाटील, दत्तात्रय सावंत, मोहनराव कदम,  विभागीय आयुक्त चद्रकांत दळवी,  जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, नगराध्यक्ष माधवी कदम, मुख्य अभियंता पी.एम. किडे, अधिक्षक अभियंता एस.एस. माने आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
ग्रेड सेपरेटर म्हणजे काय : महाबळेश्वर-सातारा-रहिमतपूर विटा रस्ता रा.मा. 140कि.मी. 52/800 मध्ये पोवई नाका येथे उड्डाण पुलाचे (ग्रेड सेपरेटरचे) बांधकाम करण्यात येणार आहे. यामुळे वाहतूक 40 टक्के विभागली जाणार आहे. कोल्हापूर व पंढरपूरकडून येणारी मोठी जड वाहनांना विना अडथळा स्टॅडकडे जाता येणार आहे. कास व राजवाड्याकडून स्टॅडकडे जाणारी वाहने सुद्धा विना अडथळा जातील. पोवई नाक्यावरील वाहतुकीची कोंडी कमी होणार आहे. त्याचबरोबर इतर वाहनांसाठी सब वे च्या बाजूने वाहनांना जाण्यासाठी एक स्वतंत्र सेवा रस्त्याची तरतुद करण्यात आलेली आहे.
या कामासाठी तांत्रिक सल्लागार नेमण्या आले आहे. रोड व वाहतूक सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. सविस्तर प्रकल्प अहवालास 51.50 कोटी किंमतीस तांत्रिक मान्यता देण्यात आलेली आहे. यामुळे सातार्‍यातील वाहतुकीवरील ताण कमी हावून वाहतूक सुरळीत होणार आहे.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular