म्हसवड :आपल्या भारत देशास खुपच जुनी संस्कृती आहे.या देशात स्त्री माता होऊ शकते त्या बरोबरच ती काय करु शकत नाही याचे उत्तम उदाहरण श्रीमती चेतना सिन्हा हे आहे असे प्रतिपादन आर्ट ऑफ लिव्हिंगचे जय गुरुदेव श्री.श्री. रविशंकर यांनी केले.बेंगलोर येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या विशालक्ष्मी या विशाल मंडपात देश विदेशातील विशेष उल्लेखनिय सेवा कार्य कार्य केलेल्या महिलांना पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते.
दावोस (स्वित्झलँड) येथील जागतिक स्तरावरील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या सहअध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली याबरेबरच माण या दुष्काळी तालुक्यतील
ग्रामीण भागातील पाणी व्यवस्थापन, महिलांसाठी देशातील पहिली माणदेशी महिला सहकारी बँकेची स्थापनेस मिळविलेले यश, ग्रामीण महिलांना व्यवसाय प्रशिक्षण व बँकेच्या माध्यमाने प्रशिक्षित महिलांना लघु उद्योगासाठी अर्थ पुरवठा इत्यादी कार्याची दखल घेऊन येथील माणदेशी महिला सहकारी बँक व माणदेशी फौंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांना आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे पुरस्कार देऊन श्री.श्री.रविशंकर यांनी त्यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव केला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.श्री.रविशंकर यांच्या भगिनी भानुमती होत्या.
श्रीमती सिन्हा यांचेसह भारतीय स्टेट बँकेच्या माजी अध्यक्षा अरुंध्दती भट्टाचार्य प्रसिध्द गायिका अनुराधा पोडवाल, हिंदी चित्रपट अभिनेत्री राणी मुखर्जी,नार्वे येथील पी.सी संस्था चालिका एमेलिन होमप्लॅन्ड, अर्जेंटीना मधील डब्लू टंव्टीच्या (थ20) अध्यक्षा सुहोनो बाल्गो, इत्यादी देश- विदेशातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या महिलांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
श्रीमती चेतना सिन्हांचे सेवा कार्य उल्लेखनीय : श्री.श्री.रविशंकर
RELATED ARTICLES