Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीफलटण शहरात स्वच्छ सर्वेक्षण अभियान उत्साहात

फलटण शहरात स्वच्छ सर्वेक्षण अभियान उत्साहात

फलटण ः फलटण नगर परिषदेचे वतीने संपूर्ण फलटण शहरातील 12 वॉर्डमध्ये स्वच्छ सवेर्र्क्षण अभियान राबविले गेले. या अभियानात स्वच्छेते विषयक जनजागृती नागरिकांना सुका कचरा, ओला कचरा वर्गीकरण करणे संबंधी सुचना, स्वत:चे शौचालय असणे विषयी माहिती व  ते बांधून वापराबाबत त्यांना जागरुक करणे. रोगराई पसरु नये म्हणून काळजी घेणेस सांगणे. घराभोवती असणार्‍या पाण्याबाबत त्याच ठिकाणी शौच खड्डा खोदून पाणी जिरवणे, आपलेच घरातील कचर्‍याचे प्लॉट मधील मोकळ्या जागेत कल्चर करून (कंपोस्ट करून) खत तयार करणे. कचरा कुड्यांमध्ये कचरा न टाकता, तो घंटा गाडीमध्ये टाकणे, प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करता कापडी पिशव्यांचा वापर दैंनंदिन जीवनात करावा. यासाठी अशोकराव जाधव व सौ.मिनाताई नेवसे यांनी संपूर्ण वार्ड क्र.4 मध्ये फिरुन नागरीकांना व महिलांना स्वच्छतेचे महत्व पटवून देवून स्वच्छता अभियानात फलटण शहरातील सर्व वार्डामध्ये घेतली असून प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल येथे  मुलांना,शिक्षकांना माहिती देण्यासाठी मार्गदर्शन मेळावे घेतले. मुख्याधिकारी धैर्यशील जाधव साहेब यांचे उपस्थितीत व आरोग्य निरीक्षक घाडगे, तुळसे साहेब व मुकादम रमेश वाघेला यांचे सहकार्याने आणि प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्यु.कॉलेजचे विद्यार्थ्यांचे सहकार्याने वार्डमध्ये स्वच्छता अभियान राबवून व कापडी पिशव्या वाटप करुन प्लास्टिक मुक्तीचा संदेश देत संपूर्ण वॉर्ड हागणदारी मुक्त करणे विषयी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी घेतले आहेत.प्रभागामध्ये जनजागरण करुन शौचालय बांधणीस प्रवृत्त केले. 
ज्यांची परिस्थिती नाही त्यांना सरकारचे अनुदानातून शौचालय बांधून देवून 100% शौचालय असलेला वार्ड म्हणून फलटणमध्ये एकमेव वॉर्ड क्र.4 चा लागतो. सक्रिय सहभाग घेतलेले वॉर्ड क्र.4 मधील नागरिक व महिला विशेष करुन शिक्षक,शिक्षिका व विद्यार्थी यांचे अशोकराव जाधव यांनी आभार व्यक्त केले.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular