Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीबावधन येथील ऐतिहासिक व पारंपारिक बगाड यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न

बावधन येथील ऐतिहासिक व पारंपारिक बगाड यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न

वाई : संपूर्ण राज्यात प्रसिध्द असणारी बावधन येथील ऐतिहासिक व पारंपारिक बगाड यात्रा शुक्रवारी काशीनाथाचं चांगभलंच्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली.
बावधन येथील भैरवनाथाचे बगाड गावाच्या पूर्वेस सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील सोनेश्वर याठिकाणी सकाळी 8 च्या सुमारास पोहचले. त्यानंतर बगाड्या मनोज सपकाळ यास कृष्णा नदीत विधीवत स्नान घालून  त्यानंतर देवदेवतांची विधिवत पूजा आणि आरती करण्यात आली. बगाड्याला वाजत गाजत बगाडाजवळ नेण्यात आले. त्याला पारंपारिक पध्दतीचा पोषाख घालून बगाडास टांगण्यात आले. यावेळी भाविकांनी नोटांची व नारळाची तोरणे, झेंडे, नवसाचे गोंडे बगाडास बांधले होते.
फोटो ओळी – बावधन येथील ऐतिहासिक व पारंपारिक बगाड यात्रा शुक्रवारी काशीनाथाचं चांगभलंच्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली.    (छायाचित्र प्रमोद इंगळे)
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular