Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीआणि रंग बोलू लागले.....! मुकबधिर निवासी शाळेमध्ये रंगपंचमी साजरी...

आणि रंग बोलू लागले…..! मुकबधिर निवासी शाळेमध्ये रंगपंचमी साजरी…

लोणंद: बाळूपाटलाची वाडी येथील श्री. स्वामी समर्थ मुकबधिर निवासी शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी रंगपंचमी साजरी केली. झाडांची पाने, फुले, हळद यांसारखे अनेक नैसर्गिक रंग वापरून या विशेष मुलांनी इको-फ्रेंडली रंगपंचमी साजरी केली. बोलू व ऐकू न शकणा-या मुलांनी रंग अंगावर पडताच जल्लोषात नाचत रंगपंचमीचा आनंद घेतला.
एशियन पेन्ट्स या कंपनीला 76 वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीच्या अधिकार्‍यांनी या विशेष मुलांसोबत रंगपंचमी साजरी केली.
यावेळी या विशेष मुलांना रंगपंचमीचे साहित्य, नैसर्गिक रंग, खेळाचे आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप एशियन पेन्ट्सतर्फे करण्यात आले.
वनराई पुणे प्रकल्प संचालक प्रकाश जगताप व प्रकल्प समन्वयक महेश लोंढे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी एशियन पेन्ट्स फॅक्टरी मॅनेजर योगेश पेठकर, त्रिदिब बॅनर्जी, राम शुक्ला, गीत श्रिवास्तव, रोशन यदुवंशी, राजेंद्र, चेतन उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular