

(छायाः अतुल देशपांडे)
साताराः रॉयल कॉलेज ऑफ पेडियाट्रिक्स अँड चाईल्ड हेल्थ, युनायटेड किंगडम आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज व त्यांची सीएसआर भागीदार असलेल्या मुकूल माधव फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथील कनिष्क हॉल मध्ये मिशन सेरेब्रल पाल्सी या उपक्रमांतर्गत तीन दिवसीय चर्चासत्र व तपासणी कार्यशाळा आयोजीत करण्यात आली आहे. या चर्चासत्राचे प्रथम भागात डॉ. अरविंद शहा, डॉ. सबॅसटियन टेलर, डॉ. मोनिका लखन पॉल, डॉ.बाशी आणि रॉड किल्प यांनी सकाळच्या सत्रात सर्व शिक्षा अभियानातील विशेष प्र्रिशक्षण, सुविधा तसेच जिल्ह्यातील तालुका समन्वयक यांचे सोबत सद्य परिस्थितीमध्ये सातारा जिल्ह्यातील सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलांसाठी सरु असलेल्या कामाचा आढावा घेतला.
तसेच सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलांच्या पालकांसोबत संवाद साधुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच या पालनकांनी विचारलेल्या व त्यांना वारंवार येणार्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी पालकांसाबत घेण्यात आललेल्या एकत्रित चर्चा आणि संवादामधुन पुणे येथील संचेती हॉस्पिटलच्या मान्यवर तज्ञ डॉक्टरांनी ही सहभाग घेउन अनेक प्रकारच्या सहयोगी सुविधा आणि मुलांच्या करिता नेमके काय उपाय योजावे. याबद्दल प्रात्याक्षिके आणि उदाहरणे दाखवत संपर्कं साधला.
या चर्चासत्रात यावेळी संतोष शेलार यांनी प्रास्ताविक करुन या कार्यशाळेत सातारा जिल्हयातील या आजाराने ग्रस्त अश्या मुलांच्या आरोग्याविषयी व या आजारावरील विशेष उपचाराविषयी जनजागृती करणे. आजाराची लक्षणे जाणून घेणे,आणि लहान वयात मुलांवर त्वरित उपचार उपलब्ध करून देणे,यासाठी पालकांना मर्गदर्शन करण्यासाठी हा उपक्रम राबवत असल्याचे प्रास्ताविकात सांगितले.
डॉ.अरविंद शहा यांनी पालकांना मार्गदशन करताान खचून जाउ नका, आपल्याला देवानेच या छोट्या देवदुतांची सेवा करण्याची संधी दिली आहे. निराश न होता, या मुलांच्यावर केल्या जाणार्या उपचाराने नक्की फरक पडेल असा विश्वास मनात व अंगी बाळगा अश्या शब्दात प्रोत्साहनपर मागर्ंदर्शन केले.
सर्व शिक्षा अभियानाचे जिल्हा समन्वयक ज्ञानदेव शेलार यांनीही उपचार पध्दती आणि या मुलांचे साबत कसे वागावे याबद्दल मोलाच्या टिप्स उपसिथतांना दिल्या, या कार्यशाळेत सर्व शिक्षा अभियानाचे जिल्हा समन्वयक ज्ञानदेव शेलार,राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाच्या जिल्हा समन्वयक फरझाना खान,डॉ. मुळे, फिनोलेक्सचे संतोष शेलार,बबलू मोकळे आदी मान्यवर उपस्थित होते. मुकुल माधवच्या बबलू मोकळे यांनी आभार प्रदर्शन केले.