Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीसातारा पालिका इमातीमध्ये राजेंद्र सुर्यवंशीचा निर्घृण खून ; संशयित आरोपी बाबू...

सातारा पालिका इमातीमध्ये राजेंद्र सुर्यवंशीचा निर्घृण खून ; संशयित आरोपी बाबू भोसलेस अटक

सातारा : सातारा नगर पालिकेच्या इमारतीखाली शनिवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास राजेंद्र बबन सुर्यवंशी (वय 40, रा. घोरपडे कॉलनी, केसरकरपेठ सातारा) याचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात तीक्ष हत्याराने गंभीर वार करून निर्घृण खुनाची घटना घडली आहे. या खुनाच्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. खुन्याचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी श्‍वान पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. श्‍वान पथकाने मृतदेहापासून ते रस्त्यापर्यंत माग काढून तेथेच घुटमळत राहिले. 
याबाबत घटनास्थळी मयत राजेंद्र सुर्यवंशी याचा भाऊ शेखर सुर्यवंशी याने पत्रकारांना माहिती देताना सांगीतले की, राजेंद्र हा माझा मोठा भाऊ आहे. त्याची पत्नी त्याला सोडून पाच ते सहा वर्षापासून माहेरी मुलांसह रहात असते. राजेंद्र हा पेंटरचे काम करतो. गेले 5 ते 6 वर्षापासून तो रात्री घरी न झोपता नगर पालिकेच्या इमारतीखाली नव्याने गाळे काढले आहेत. त्या गाळ्यांमध्ये झोपण्यास जात असतो. राजेंद्र सोबत सातारा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागात झाडलोट करणारा राजा नावाचा (पूर्ण नाव नाही) इसमही झोपत असतो. रात्रीच्यावेळी मयत राजेंद्र घरातून झोपण्यास जातो असे सांगून गेला होता, असे माहिती देताना सांगितले.
पालिकेच्या इमारतीमध्ये खुनाची घटना घडली आहे अशी माहीत मिळताच घटनास्थळी पो. उपधिक्षक धरणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पो. नि. पद्माकर घनवट, सहा. पो. नि. प्रसन्न जर्हाड, शहर पोलीस ठाण्याचे पो. नि. सारंगकर आणि पोलीसांचा फौजफाटा दाखल झाला. सातारा नगर पालिकेने नव्याने बांधलेल्या तळघरातील गाळ्यांमध्ये राजेंद्र सुर्यवंशी या इसमाचा मृतदेह अंथरूणावर आढळून आला. त्याच्या डोक्यात अज्ञात व्यक्तीने निघृणपणे तीक्ष हत्याराने गंभीर वार केल्याने रक्ताच्या चिळकांड्या भिंतीवर उडालेल्या दिसत होत्या. मृतदेहाच्या शेजारी दारूच्या बाटल्या आणि जेवणाच्या पिशव्या अस्ताव्यस्त पडलेल्या दिसत होत्या. खुन करून फरारी झालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी श्‍वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. श्‍वान पथकाला त्या मृतदेहाचा वास आणि शेजारी पडलेल्या अन्य वस्तुंचा वास दिल्यानंतर श्‍वान पथक मृतदेहाच्या परीसरात फिरत राहिले. त्यानंतर पुन्हा ते नगर मुख्य रस्त्याकडे पळत गेले. रस्त्यावरून पुन्हा मृतदेहाजवळ आले आणि त्याच ठिकाणी घुटमळत राहिले. ठसे तज्ञ अनिल कोळी यांनाही पाचारण करण्यात आले होते. ठसे तज्ञांनी मृतदेहा शेजारी पडलेल्याव वस्तुंवरचे ठसे घेतले. मयत राजेंद्रच्या खिशात डायरी मिळून आली. मयत राजेंद्र हा पालिकेपासून हाकेच्या अंतरावर जवळच असलेल्या घोरपडे कॉलनीत रहात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलीसांनी त्याच्या कुटूंबीयांशी संपर्क साधला. यावेळी त्याचा भाऊ शेखर बबन सुर्यवंशी याने मयत राजेंद्र हा आपला भाऊ असल्याचे सांगीतले.
दरम्यान राजेंद्र सुर्यवंशीचा खुन नेमका कोणत्या कारणाने झाला. याचे कारणही अद्यापही पोलीस यंत्रणेला समजले नाही. राजेंद्र हा पेंटरचे काम करतो. त्याचा कुणाशी संबध आहेत हे तपासण्याचे काम सुरू आहे. खुनाच्या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
सातारा नगरपालिकेच्या इमारतीखाली असलेल्या शॉपिंग सेंटर परिसरात शनिवारी मध्यरात्री राजेंद्र बबन सुर्यवंशी (वय 45, रा. घोरपडे कॉलनी, केसकरपेठ सातारा) यांचा त्याच पेठेत राहणार्‍या बाबू भोसले याने डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केला होता. या खुनाचा छडा लावण्याचे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले असतानाच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अवघ्या 9 तासांत या खुनाचा पर्दाफाश केला. दारू आणि जुन्या वादाच्या कारणातून हा खून झाला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular