Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीमोदीश्वरांना म’श्‍वरमध्ये स्वच्छतेचा सविनय टोला

मोदीश्वरांना म’श्‍वरमध्ये स्वच्छतेचा सविनय टोला

सातारा : पर्यटन वाढववताना नियमांची काटेकोर अंमलबजावणी कशी करावे, याचे उत्तम उदाहरण महाबळेश्वर पालिकेने घालून दिले. गुजरातेतील पर्यटक महाबळेश्वर पर्यटन करायला आले असताना त्यांनी रस्त्याकडेला चूल मांडून पर्यावरणाचे नियम मोडल्यामुळे ममश्वर पालिकेच्यावतीने सव्वा दोन हजारांची दंडात्मत कारवाई करण्यात आली. त्यामुळे शहरात स्वच्छतेचा नारा देताना स्वच्छ प्रशासन राबवण्याचे धोरण नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी प्रत्यक्षात अंमलात आणल्याच्या चर्चा जिल्ह्यात रंगल्या आहेत.
मश्वरा शहरात गुजरात येथील पर्यटक (जीजे 07 वाय.झेड. 9655) या बसमधून आले आणि रस्त्याकडेला चूल थाटली. लाकूडफाटा गोळा करून रानात पार्टी केल्याप्रमाणे स्वच्छंद हा प्रकार सुरु असताना याची माहीती काही नागरिकांनी पालिकेत दिली. पर्यटकांना सुविधा देण्यासाठी कटीबद्ध असलेल्या महाबळेश्वर पालिकेचा देशात लौकिक आहे.
स्वच्छ सर्वेक्षण अभियानात हिरहिरीने सहभाग घेणार्‍या पालिकेत महाबळेश्वर पालिकेचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. मात्र, नियमनही पायमल्ली करणार्‍यांना वेळीच रोखण्याचे औदार्य दाखवण्याची तत्परता ही हवी. नगराध्यक्षा शिंदे यांनी कारवाईचे आदेश दिले.
शहरात छोटे-मोठे हॉटेल्स असताना पर्यावरणाला हानी पोहचवणारा हा प्रकार योग्य नसल्याने पालिका आरोग्य विभागाने केलेल्या कारवाईत सदर प्रकरणी 2240 रुपयांचा दंड करताना असे प्रकार करणार्‍यांना कडक संदेश प्रत्यक्ष कृतीतून देण्यात आला.
या कारवाईमुळे पर्यटकांचे स्वागत करताना चुकीला थारा नसल्याचा संदेश दिला गेला असला तरी अशा प्रकारे कारवाईत सातत्य राखण्यात यावे, अशी मागणी म’श्वरकर करत आहेत.
म’श्वरकरांसमोर
मोदीश्वरांचे नमो…
कारवाई न करण्यासाठी या पर्यटकांपैकी अनेकांनी थेट गुजरातेत फोनाफोनी केली. पण काहीच उपयोग झाला नाही. उलट अरेरावी केल्यास कठोर कारवाई होऊ शकते, हे मोदीश्वरांच्या लक्षात आल्यानंतर काही पर्यटकांनी ममश्वरकरांसमोर हात जोडत घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular