वडूज: म्हासुर्णे ता.खटाव येथील अमित माने या फौजी जवानास प्रशिक्षण कालावधीत बेस्ट फिजीकल ट्रॉफी मिळविण्याचा बहुमान प्राप्त झाला.
आयटी बीपी बलमहानिरीक्षक देवेंद्र सिंग यांच्या हस्ते माने यास ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला.श्री. माने यांचे आई वडील लहान पणी निर्वतल्याने त्यांचे शालेय शिक्षण खातवळ येथील आजोबा कै. डॉ. साहेबराव दत्तात्रय फडतरे यांच्या घरी झाले. खातवळ येथे राहूनच त्यांनी शालेय माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर औंध येथे औद्योगिक प्रशिक्षण घेऊन सातारा येथील औद्योगिक वसाहतीत काही काळ नोकरी केली. ती नोकरी करत असतानाच ते भारतीय सैन्य दलात भरती होत यशस्वी प्रशिक्षण पूर्ण करत चांगला बहुमान पटकाविला आहे.
अमित माने यांना बेस्ट फिजीकल ट्रॉफी
RELATED ARTICLES