पुणे: – राष्ट्रीय नाभिक महासंघ संलग्न महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांच्या सहयोगाने ‘ गौरव कार्यकर्तृत्वाचा ‘ स्वातंत्र्यसेनानी हुतात्मा वीर भाई कोतवाल राज्यस्तरीय गौरव सोहळा,’ या सन्मान सोहळ्याचे आयोजन 24 मे रोजी सकाळी 10 वा.गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट, पुणे येथे करण्यात आले आहे. समाजातील सांस्कृतिक,शैक्षणिक,सामाजिक,वैद्यकीय,कला,क्रीडा,साहित्य,चित्रपट,नाट्य, यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारया मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे. राष्ट्रीय नाभिक महासंघ अध्यक्ष श्री भगवानराव बिडवे यांनी याबाबत माहिती दिली. या सन्मान सोहळ्यात ज्यांनी नाभिक समाजाच्या उन्नतीसाठी कार्यरत राहून त्यागमय जीवन व्यतीत केले आहे असे स्व.हणमंतराव साळुंखे, विधानसभा माजी सभापती स्व.शंकरराव जगताप,स्व. ना.भु.संगमवार,स्व.गणपतराव तिरपणकर,स्व.दिनकरराव गोरे,स्व.उत्तमराव गंगधर,यांना मरणोत्तर पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मा.उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, मा.नंदकिशोर वर्मा,राज्यमंत्री मध्यप्रदेश केशकला बोर्ड, मा.मोहनजी मोरवाल राज्यमंत्री राज्यस्थान केशकला बोर्ड,मा.सुरेशजी सेन राज्यमंत्री हरियाना केशकला बोर्ड, सिनेस्टार गणेश यादव,किशोर कदम,कुशल बद्रीके या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये संपन्न होणार आहे.या सोहळ्यामध्ये आंतरराष्ट्रीय जलतरणपटू अमोल आढाव,ऋषीकेश राऊत,पतीच्या निधनानंतर नाभिक व्यवसाय करणारया शांताबाई यादव,सौरव वखरे, डाॅ. गौराम बिडवे, कलाकार राजन वैद्य, सुंद्रीवादक सुरमणी पंडीत खळदकर,वैद्य अविनाश काशीद, यांच्यासह विविध क्षेत्रातील 140 मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे. राज्यासह देशभरातील नाभिक समाज बांधव या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.त्यासाठी महासंघातर्फे पूर्व तयारी करण्यात आली आहे.समाजबांधवांना सर्व प्रकारच्या सेवा सुविधा यावेळी उपलब्ध करुण देण्यात येतील अशी माहिती श्री भगवानराव बिडवे यांनी दिली. कार्यक्रमाचे संयोजन इव्हेंट इंडिया या प्रसिध्द इव्हेंट मॅनेजमेंन्ट सर्व्हिसेस कंपनीने केले असुन तरी या कार्यक्रमासाठी सर्व समाज बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
राष्ट्रीय नाभिक महासंघातर्फे गौरव सोहळा : श्री भगवानराव बिडवे
RELATED ARTICLES