Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीजि. प. सदस्य सुरेंद्र गुदगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

जि. प. सदस्य सुरेंद्र गुदगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

मायणी :- (सतीश डोंगरे) खटाव तालुक्याचे नेते सातारा जिल्हा परिषद तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य,मायणी अर्बन बँकेचे चेअरमन सुरेंद्र गुदगे व त्यांचे कट्टर समर्थक व मायणी ग्रामपंचायत विरोधी गटनेते रणजित माने यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुरेंद्रदादा गुदगे युथ क्लब मायणी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यानी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन शिबीर यशस्वी केले. यावेळी मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव सुधाकर कुबेर,संचालक बाळासाहेब जाधव ,वडूज बाजार कमिटीचे संचालक किरण देशमुख,माजी संचालक दादासो कचरे सर,हेमंत जाधव,अरुण सुरमुख,अरुण जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
‎हा भव्यदिव्य रक्तदान शिबिर सोहळा श्री सिद्धनाथ मंदिर मायणी येथे पार पडला, या रक्तदान शिबिरासाठी सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल संलग्नित मिरज येथील ब्लड बँकेने या शिबिरास सहकार्य केले. रक्तदान शिबिरासाठी रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान हेच श्रेष्ठदान असल्याची दाखवून दिले. यावेळी रक्तदात्याना मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक बाळासाहेब जाधव यांनी भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सुरेंद्र दादा गुदगे युथ क्लब च्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular