Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीयुवा माहिती दूत उपक्रमाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते 15 ऑगस्ट रोजी शुभारंभ

युवा माहिती दूत उपक्रमाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते 15 ऑगस्ट रोजी शुभारंभ

सातारा  : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत युवा माहिती दूत असा अभिनव उपक्रम सुरू होत आहे. या युवा माहिती दूत उपक्रमाचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री  विजय शिवतारे  यांच्या हस्ते दि.15  ऑगस्ट 2018  रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात सकाळी 10.30  वाजता होणार आहे.
शासनाच्या विकास योजनांची माहिती गाव पातळीपर्यंत लाभार्थींना मिळावी या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला आहे.  माहिती दूत त्यांच्या तालुक्यातील 50 कुटुंबांशी समक्ष संपर्क साधुन शासकीय योजनांची माहिती देणार आहेत.
युवा माहिती दुतांची नोंदणी महासंचालनालयाने तयार केलेल्या पवर ऑनलाईन होणार आहे.  हे प प्ले स्टोअरवर युवा माहिती दुत या नावाने उपलब्ध असेल.  प्ले स्टोअर वरुन हे प डाऊनलोड करुन युवा माहिती दूत म्हणून नोंदणी करता येणार आहे.  या युवा माहिती दूतांना विकास योजनांवरील व्हीडीओ क्लिप, शासकीय योजनांची माहिती असणा-या पुस्तिका, घडीपत्रिका महासंचालनालयामार्फत पुरविण्यात येणार आहेत.  15 ऑगस्ट नंतर सहा महिन्याच्या कालावधीत माहिती दूतांनी 50 कुटुंबाशी समक्ष संपर्क साधून त्यांना विकास योजनांची माहिती द्यावयाची आहे.  तसेच डाऊनलोड केलेल्या पवर कुटुंबाशी भेट दिलेल्या बाबतची माहिती अपलोड करावयाची आहे.  प्रत्येक तालुक्यात एक समन्वयक निवडला जाणार आहे.  जिल्हा माहिती अधिकारी, सातारा हे या उपक्रमाचे नोडल ऑफिसर म्हणून काम पाहणार आहेत.
15 ऑगस्ट 2018 रोजी आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील युवक-युवती तसेच युवा माहिती दूत म्हणून इच्छुक व्यक्तींनी यावे तसेच माहिती दूत म्हणून उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील  यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 02162-237440/41 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular