फलटण (प्रतिनिधी)- दूध व्यवसायासाठी येथील खाजगी सावकाराकडून व्याजाने साडेसहा लाख रुपये घेऊन त्याची 48 लाख रुपयांचे परतफेड करूनही जबरदस्तीने घरात घुसून आई-वडिलांना शिवीगाळ दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघा सख्य्या भावा विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आठवड़ा भरात सलग दुसरा गुन्हा या खाजगी सावकारकी करणाऱ्या भावा विरोधात नोंदविण्यात आला आहे.
याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यात शिवाजी सुभाष भापकर (वय 45) राहणार धुळदेव, तालुका फलटण यांनी दिलेल्या फिर्यादिनुसार ऑगस्ट 2014 मध्ये दूध व्यवसाय करिता संतोष नरसिंग पवार व उमेश नरसिंग पवार (दोघे राहणार सोमवार पेठ फलटण) यांच्याकडून त्यांच्या घरी साडेसहा लाख रुपये 10 टक्के व्याजाने घेतले होते त्याचे दर महा 65 हजार रुपये व्याज देऊन देखील माझा महिंद्रा ट्रॅक्टर ट्रेलर खूंटे येथे वीटभट्टीवर तारण म्हणून ठेवून घेतला तसेच व्याजापोटी आत्तापर्यंत 48 लाख रुपये देऊन देखील माझे घरी धुळदेव येथे येऊन मी व माझा भाऊ घरात नसताना जबरदस्तीने घुसून त्यांनी माझी आई लताबाई व वडील सुभाष बबनराव भापकर यांना महिन्याचे व्याज पूर्ण दिलेले नाही असे म्हणून तुमचे मुलांना जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत शिविगाळ दमदाटी केली असे फिर्यादित म्हटले आहे. या आठवड्यात पवार बंधू विरोधात खाजगी सावकारकीचा सलग दुसरा गुन्ह्या दाखल झाला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिंगटे करीत आहेत.