Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीबाबुमियाँ फरास यांचेवर शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार

बाबुमियाँ फरास यांचेवर शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार

सातारा दि. २५ – सातारा जिल्ह्यातील जेष्ठ आझाद हिंद सैनिक व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे सहकारी इब्राहिम उमर ऊर्फ बाबुमियाँ फरास यांच्या पार्थिवावर सातारा येथील गेंडामाळ कब्रस्तान मध्ये संपूर्ण शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार ( दफनविधी ) करण्यात आले. त्यांना बंदुकीच्या फैरी झाडुन पोलीस दलाने बिगुलाची शोकधुन वाजवुन मानवंदना दिली.
काल रात्री बाबुमियाँ फरास यांचे वृद्धापकाळाने सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना वयाच्या९८व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच समाजातील सर्वच थरातील नागरिकांनी त्यांच्या शनिवार माची येथील शाहूकृपा या निवासस्थानी अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. अंत्यदर्शन घेणारयांमध्ये राजघराण्यातील श्री छ शिवाजीराजे भोसले , खा ऊदयनराजे भोसले , आ शिवेंद्रसिंहराजे भोसले , विक्रमराजे भोसले , अक्कामहाराज , तसेच माजी ऊपनगराध्यक्ष अमोल मोहिते , सुधीर धुमाळ , शकिल बागवान , प्रकाश बडेकर , यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.
आज सकाळी १० वाजता सातारा शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या नेत्रुत्वाखालील पोलिसांनी माची पेठ येथे शोकधुन वाजवुन मानवंदना दिली. सारंगकर यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून पार्थिवावर तिरंगा ध्वज लपेटला. त्यानंतर अंत्ययात्रा सुरू झाली.
अंत्ययात्रा गेंडामाळ कब्रस्तान मध्ये पोचल्यावर तेथे तहसीलदार यांनी पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर शाहुपुरी पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ , पो.नि. बेंदरे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर पोलीस दलाने मानवंदना दिली. बंदुकीच्या तिन फैरी झाडल्या. पोलिसांनी पार्थिवावरील तिरंगा ध्वज बाबुमियाँ फरास यांच्या कुटुबियांकडे सुपुर्द केला . हा ध्वज कुटुंबियांच्या तर्फे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्विकारला. बाबुमियाँ विषयी माहिती विजय मांडके यांनी दिली. त्यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बाबुमियाँ च्या कार्याचे महत्व सांगितले आणि राजघराण्याशी फरास कुटुंबियांचे असलेले जिव्हाळ्याचे संबंध यापुढे सुध्दा कायम राहतील असे सांगितले. त्यानंतर या आझाद हिंद सैनिकाला शांत उभे राहून सर्वांनी आदरांजली वाहिली.
या वेळी अच्युतराव जाधव प्रकाश बडेकर , अस्लम तडसरकर , विजय निकम , शिरिष जंगम , फिरोज पठाण , रफिक बागवान , दत्तात्रय कारंडे आदि उपस्थित होते

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular