Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या विनोद भोसले यांच्या कुटुंबियांना सकल मराठा...

खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या विनोद भोसले यांच्या कुटुंबियांना सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा समन्वयक यांची आर्थिक मदत

फलटण प्रतिनिधी- -:  होळ उपसरपंच विनोद भोसले यांनी खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आणि त्यांचे अख्खे कुटुंबासह त्यांची लहान मुले उघड्यावर आली त्यांचे छत्र हरपले या मुळे माणुसकीच्या भावनेतून त्यांच्या कुटुंबातील लोकांना सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा समन्वयक यांनी आर्थिक मदत केली व इतर दानशूर व्यक्तींनी त्या लहान मुलांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
होळ ता.फलटण चे विद्यमान उपसरपंच विनोद भोसले यांनी अवैध सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आणि त्या कुटुंबातील लोकांसह गावावर शोक कळा पसरली आणि त्यांची लहान मुले वडिलांचे छत्र हरपल्याने त्यांच्या भवितव्यासाठी मराठा क्रांती मोर्चा चे समनव्यक यांनी एकत्र येत त्या मुलांना सकल मराठा समाजाच्या महिलांच्या हस्ते रोख स्वरूपात मदत करून माणुसकीचे दर्शन घडवत सकल मराठा समाजातील दानशूर व्यक्तींनी या मुलांना मदत करण्याचे आवाहन केले .
जेमतेम दीड एकर जमीन या कुटुंबातील लोकांना असून भोसले यांना दोन चिमुकल्या भावंडानसाठी पुढे येत त्यांना आर्थिक मदत करून एक समाजापुढे आदर्श निर्माण केला असून आपल्या समाजाकडे असलेली निर्मळ भावनेतून या कुटुंबातील लोकांना मदत करणे आपले कर्तव्य समजून केलेली आर्थिक मदत ही समाजातील लोकांसाठी प्रेरणादायी ठरेल असे मत व्यक्त होत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular