Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीम्हसवडला 16 रोड रोमिओ ताब्यात ; पोलिसांच्या कारवाईचे म्हसवड शहरात स्वागत

म्हसवडला 16 रोड रोमिओ ताब्यात ; पोलिसांच्या कारवाईचे म्हसवड शहरात स्वागत

म्हसवड : म्हसवड शहरात विविध ठिकाणी 16 रोडरोमियोंना ताब्यात घेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. म्हसवड पोलिसानी केलेल्या या कारवाइचे म्हसवडमध्येे स्वागत करण्यात येत आहे.
कॉलेज युवतींना कॉलेज परिसर तसेच शाळा, एसटी स्टँड परिसरात तसेच रस्त्याने येता-जाता झिपरट्या फॅशनचे बाईकवरुन घिरट्या घालणार्‍या रोडरोमिओंचा त्रास वाढला होता. शहरातील महत्वाच्या ठिकाणी रस्त्यात उभे राहून मुलींकडे एकटक पाहणार्‍या या टुकारांचा दररोजचा त्रास वाढला होता. त्यामुळे अशा झिपरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पालकांसह नागरिकांनी केली होती.
आज म्हसवड पोलिस ठाण्याचे सपोनि मालोजिराव देशमुख, वाहतुक शाखेचे हवालदार एस. पी. बागल, प्रदिप जाधव, सुरज काकडे यानी म्हसवड शहरातील सिध्दनाथ हायस्कूल, बस स्थानक चौक, सिध्दनाथ मंदीर या परिसरातील 16 रोड रोमियोंवर कारवाई करीत त्याना ताब्यात घेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
पोलिसांच्या या कारवाईचे म्हसवड शहरात स्वागत करण्यात येत असून ही कारवाई अशीच पुढेही सुरु ठेवण्याची मागणी होत आहे.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular