Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीरा.ना.गोडबोले सार्वजनिक ट्रस्टतर्फे येत्या रविवारी ट्रेकर्स ग्रुपना साहित्य प्रदान समारंभ

रा.ना.गोडबोले सार्वजनिक ट्रस्टतर्फे येत्या रविवारी ट्रेकर्स ग्रुपना साहित्य प्रदान समारंभ

साताराः येथील रा.ना.गोडबोले सार्वजनिक ट्रस्टतर्फे महाबळेश्‍वर येथील सह्याद्री ट्रेकर्स व महाबळेश्‍वर ट्रेकर्स या दोन्ही ग्रुपना दोर (रोप्स), वॉकीटॉकी, स्ट्रेचर्स आदी उपयुक्त साहित्य प्रदान केले जाणार आहे. येत्या रविवारी 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वा. राजवाडा परिसरातील समर्थसदन मध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास सातारचे ज्येष्ठ संशोधक, लेखक व सामाजिक कार्यकर्ते डॉ.दत्तप्रसाद दाभोळकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
नुकत्याच महाबळेश्‍वर नजीकच्या अंबेनळी घाटात झालेल्या भीषण दुर्घटनेत अपघातग्रस्तांना निःस्वार्थी माणुसकीने मदत करणार्‍या सह्याद्री ट्रेकर्स व महाबळेश्‍वर ट्रेकर्स या संस्थांना सामाजिक बांधिलकीच्या भावनेने मदत करावी या आवाहनाला संपूर्ण राज्यातून नव्हे तर देशभरातून अनेकांचे सहाय्य लाभले. कोकणातील खेडेगावापासून ते मुंबईपर्यंतच्या शेकडो नागरिकांनी 51 रूपयापासून 15 हजार रूपयापर्यंत मदत दिली. ही मदत व निधी मिळून 2 लाख रूपयाहून अधिक रक्कम गोळा झाली या रकमेतून या दोन्ही समुहांना रोप्स, वॉकीटॉकी, स्ट्रेचर्स, टीशर्ट आदी साहित्य प्रदान केले जाणार आहे. या आगळयावेगळया कार्यक्रमास सातारकरांनी मोठया संख्येने उपस्थित राहून या समुहाला पाठबळ द्यावे असे आवाहन ट्रस्टचे वतीने विश्‍वस्त अरूण गोडबोले यांनी केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular