म्हासुर्णे :- (प्रतिनिधी तुषार माने) म्हासुर्णे ते खेराडे वांगी रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असुन प्रचंड मोठे खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली आहे.तातडीने रस्ता दुरुस्त करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा म्हासुर्णे ग्रामस्थांनी दिला आहे.
म्हासुर्णे येथुन खेराडे वांगी मार्गे विटा शहराकडे येण्याचा जाण्याचा मुख्य रस्ता आहे.गेल्या कित्येक वर्षात या रस्त्यावर डांबरीकरण सोडाच पण मुरमीकरण सुध्दा झाले नाही म्हासुर्णे हे गाव कराड उत्तर मतदार संघात येत आहे तर खेराडे वांगी हे गाव पलुस कडेगाव या मतदारसंघात येते दोन मतदारसंघाच्या मधील रस्ता अत्यंत खराब झाला असुन जागोजागी खड्डे पडले आहेत साडे तीन ते चार किलोमीटरच्या रस्त्यामध्ये कोठेही डांबरी रस्ता शिल्लक राहिला नाही.रस्त्याची प्रचंड दुरावस्था होवुनही संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे .या रस्त्यावरील खड्डेही कधी भरले गेले नाहीत .अनेक वेळा गाड्या खड्ड्यात पडुन अनेकजण जखमी झाले आहेत.रस्ता दुरुस्त होत नसल्यामुळे चिडलेल्या ग्रामस्थांनी रस्ता तातडीने दुरुस्त न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
म्हासुर्णे – खेराडे वांगी रस्त्याची दुरवस्था
RELATED ARTICLES