

सातारकरांनी सुसकारा सोडला…सातारा शहरातील शिवाजी सर्कल पोवई नाका येथे ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे गेली 5 महिने बंद असलेला प्रमुख रस्ता आज दुपारी पादचार्यांना चालण्यासाठी सुरु करण्यात आला. यामुळे हजारो नागरिकांनी या नव्या रस्त्यावरील ये जा करीत सुसकारा सोडला. दरम्यान, पोवई नाका ते रयत शिक्षण संस्थेकडे जाणार्या मार्गावर ग्रेड सेपरेटरचे काम वेगाने सुरु आहे. (सर्व छाया : अतुल देशपांडे)