Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीगणेशोत्सव शिस्तबध्द शांततेत साजरा करा - पो. नि. भापकर ; बैठकीचे नियोजन...

गणेशोत्सव शिस्तबध्द शांततेत साजरा करा – पो. नि. भापकर ; बैठकीचे नियोजन दाटी-वाटीत … पोलीस स्टेशनच्या व-हांड्यात

पाटण :- हिंदू संस्कृतीमध्ये गणेशोत्सव हा पवित्र सण मानला जातो. हा उत्सव तरूण मंडळानी शिस्तबध्द व शांततेत साजरा करत कायदा व सुव्यवस्था राखून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे तसेच विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्ये सोडून डाॅल्बीवर बंदीच राहील यासाठी सर्व गणेश उत्सव मंडळांनी सहकार्य करावे. असे आवाहन पाटणचे सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर यांनी पाटण पोलीस स्टेशनमध्ये आयोजित शांतता बैठकीत केले. या बैठकीला पाटण परिसरातील सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्व गावचे पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र हि शांतता बैठक पोलीस स्टेशनच्या समोरील प्रशस्त प्रतिक्षालयाचा हौल सोडून पोलीस स्टेशनच्या छोट्या व-हांड्यात आयोजित केल्याने जमलेल्या मंडळाचे कार्यकर्ते व सर्व पोलीस पाटलांना दाटी – वाटीने बसावे लागले पहिल्याच मिटींगला पाटण पोलीस स्टेशनची बैठकीचे नियोजन शिस्त दिसल्याची चर्चा बैठकीस जमलेल्या कार्यकर्ते व पोलीस पाटलांच्यात सुरू होती.

यावेळी बोलताना श्री.भापकर म्हणाले पाटण तालुक्यात गणेशोत्सव सुरळीत पणे पार पाडण्यासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पाटण पोलीस सतर्क आहे. तालुक्यात २६५ मंडळांनी नोंदणीकृत केले असून २६ गावांत एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यात येत आहे. सार्वजनिक मंडळांनी शक्यतो प्रबोधनात्मक देखावे सादर करावे, धार्मिक तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे देखावे, पोस्टर्स, लावू नयेत, मंडळांनी गणेश मुर्तीसह मंडप, लायटींग, याबाबत विशेष काळजी घ्यावी. तसेच स्वयंसेवक नेमून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावा. देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या महिला युवतींचे छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने स्वयंसेवकांनी शक्यतो बॅरिगेटस लावून महिलांची स्वतंत्र रांग करावी.रितसर स्पिकर परवाने घेऊन आवाजाची मर्यादा ठेवावी. मंडळाच्या पाठीमागे कार्यकर्त्यांनी पते जुगार. मद्यपान न करता गणेश मूर्तीचे पावित्र्य राखावे. विसर्जन मिरवणुकीत डाॅल्बीवर पूर्णपणे बंदी आहे. उल्लंघन केल्यास कोणतीही हयगय न करता कडक कारवाई करण्यात येईल. गणेशोत्सवाच्या काळात कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता शिस्तबध्द व शांततेत गणेशोत्सव साजरा करून समाजात कायदा सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन पोलिस निरीक्षक भापकर यांनी केले.
यावेळी नगरसेवक सचिन कुंभार म्हणाले की, पाटण मधील सर्व गणेश मंडळे दरवर्षी शांततेत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतात, पोलीस प्रशासनाच्या अटी व शतीॅ नुसार गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका पार पाडल्या जातील. समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मंडळाच्या वतीने पोलीस प्रशासनास आवश्यक सहकार्य केले जाईल अशी ग्वाही दिली. या बैठकीस महिला दक्षता कमिटीच्या सदस्या आयेशा सय्यद, विजय थोरवडे, गोरख नारकर, लक्ष्मिण चव्हाण, सुनील चौधरी, यांच्या सह तालुक्यातील विविध गणेश मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी कार्यकर्ते सर्व गावचे पोलीस पाटील उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular