Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे विभागीय स्पर्धेत घवघवीत यश

श्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे विभागीय स्पर्धेत घवघवीत यश

म्हासुर्णे (प्रतिनिधी तुषार माने ) : महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक मंडळ पुणे व सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळ व जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने १४ संप्टेबर हिंदी दिनानिमित्त खटाव माण व फलटण या तालुक्याच्या विभागस्तरावरील स्पर्धा ९ संप्टेबर २०१८ रोजी हनुमानगिरी हायस्कुल पुसेगाव येथे संपन्न झाल्या.त्यामध्ये श्रीराम विद्यालय म्हासुर्णेच्या विद्यार्थीनी घवघवीत यश संपादन केले.सर्व विद्यार्थ्यांची २२ संप्टेबर २०१८ रोजी सातारा येथे होणाऱ्या जिल्हा व राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.यश संपादन केलेले विद्यार्थ्यांमध्ये १)सुलेखन प्रतियोगिता – कु.निशा आण्णासो माने इयत्ता सहावी द्वितीय क्रमांक २)वक्तृत्व प्रतियोगिता -कु.हर्षा संजय माने इयत्ता आठवी प्रथम क्रमांक २)कु.गायत्री संजय विभुते सातवी चतुर्थ क्रमांक ३)मेरा शब्दकोश -कु.साक्षी नारायण माने इयत्ता आठवी प्रथम क्रमांक ४)शुध्दलेखन प्रतियोगिता – कु.प्रिती आण्णा माने इयत्ता नववी तृतीय क्रमांक ५)सामान्यज्ञान प्रतियोगिता -प्रकल्प प्रकाश वेदपाठक इयत्ता दहावी तृतीय क्रमांक या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना हिंदी विभाग प्रमुख श्री.शंकर के.राठोड(सर) व श्री.अभिजित. केराम(सर)यांचे मार्गदर्शन लाभले.सर्व यशस्वी विद्यार्थीचे शाळेचे मुख्याध्यापक पी.व्हि.हांडे सर,वंदना माने मँडम,शेख सर ,परदेशी सर,तोरणे सर,म्हमाणे मँडम,तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षण सल्लागार मंडळाचे चेअरमन महादेव माने, राजाराम माने,रामचंद्र पाटील, सरपंच सचिन माने,सुहास माने,ग्रामपंचायत सदस्य तुषार माने,विठ्ठल माने,सिकंदर मुल्ला,महेश पवार,हेमंत कुलकर्णी,सर्व संचालक मंडळ, ग्रामपंचायत सदस्य,विकास सेवा सोसायटी ,ग्रामस्थ यांनी विशेष अभिनंदन केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular