सातारा ः येथील इनरव्हील क्लब ऑफ सातारा कँप शाखेच्या वतीने नुकताच हॉटेल राधिका पॅलेस येथे झालेल्या भव्य समारंभात सातारा परिसरातील जिल्हा परिषद, नगरपालिका व शासन मान्य अनुदानित विविध शाळंामधील 17 शिक्षकांचा पुरस्कार देउन गौेरव करण्यात आला. भारत साक्षरता मिशनच्या वतीने नेशन बिल्डर अॅवॉर्ड या उपक्रमांतर्गत हे सत्कार संपन्न झाले.
या सत्कार सोहळयास सातारा येथील बॉटनी विभागाच्या प्रमुख सौ. वनीता कारंडे, माध्यमिक विभागाच्या उप शिक्षणाधिकारी सौ. शबनम मुजावर यांची या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
क्लबच्या अध्यक्षा सौ.नीना महाजन यांनी खर्या अर्थाने देश आणि सर्वाना घडवणार्या गुरु अर्थात शिक्षकंाचा सन्मान करण्याची संधी क्लबच्या उपक्रमात आम्हाला मिळत आहे ही मोठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट असल्याचे प्रास्ताविक भाषणात सांगितले.
यावेळी सर्व सत्कार मुर्तींचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्माचिन्ह,प्रशस्तीपत्र देउन गौरव करण्यात आला. यावेळी काही सत्कार मुर्तींनीही आपले मनोगत व्यक्त केले.
प्रमुख पाहुण्या सौ.वनीता कारंडे यांनी आपण जे काही आहोत ते शिक्षकंाच्या घडवण्यातूच आहोत. आज हे सर्व शिक्षक खर्या अथार्ंने माणूस,समाज आणि राष्ट्र घडणवणारे शिल्पकार आहेत असे सांगुन सर्व शिक्षकांना वंदन केले.
सौ.शबनम मुजावर यांनी क्लबच्या उपक्रमात एक खरेाखरच आदर्श असा उपक्रम देत इनरव्हील क्लबने सर्व गुरुंचे सत्कार करुन त्यांचे प्रति आदरच व्यक्त केल्याचे सांगतिले. सौ. अंजली देशपांडे यांनी समारंभाचे सुत्र संचालन केले तर आभार प्रदर्शन सैा. रेणू येळगावकर यांनी केले.
समारंभास माजी प्रांतपाल सौ.गीता मामणिया, सचीव रेणू येळगावकर, लीना कदम, माजी अध्यक्षा सीमा मुथा,ज्योत्सना बोधे यांचेसह विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षीका, सत्कारमुर्तींचे नातलग आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इनरव्हील क्लब सातारा कॅम्पतर्फे विविध शाळांतील 17 शिक्षकांचा पुरस्कार देऊन गौरव
RELATED ARTICLES

